निलेश लंकेंचे एकाच वेळी दोन दगडावर पाय ! एका ठिकाणी आमदारकी जायची भीती तर पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रह

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : अहमदनगरच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोड घडत आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत आणि यामुळे नगरचे राजकारण तापू लागले आहे. नगरच्या राजकीय वर्तुळात मात्र गेल्या काही दिवसांपासून पारनेरच्या आमदारांची मोठी चर्चा आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजितदादा यांच्या गटात आहेत मात्र लवकरच ते पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे परतत तुतारी फुंकणार अशा चर्चा सुरू आहेत.

मात्र, अजूनही निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की, निलेश लंके हे नगर दक्षिणमधून शरद पवार यांच्या गटाकडून लोकसभा लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी सुद्धा पूर्ण झाल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके कुणाचे ? ही जी चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राजकीय तज्ञांपासून ते दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात सुरू होती ती आता निकाली निघणार हे स्पष्ट होत आहे.

म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता सुजय विखे यांच्यापुढे लंके यांचे आव्हान राहणार हे जवळपास फायनल झाले आहे. आता फक्त याची घोषणा होणे बाकी राहिले आहे. परिणामी यंदाची निवडणूक ही अधिक काटेदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंके यांनी लोकसभा लढवण्याची तयारी फार पूर्वीपासून सुरू केलेली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गटात पक्षप्रवेशाची अन उमेदवारीची चर्चा देखील गेल्या महिन्याभरापूर्वीच पूर्ण झाली होती.

मात्र कायदेशीर बाबींमुळे हा निर्णय लवकर घेतला गेला नाही. खरंतर शरद पवार 13 मार्चला नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळीच लंके यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली होती. मात्र कायदेशीर बाबींमुळे ही गोष्ट पुढे ढकलली गेली.

दरम्यान आता निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटाकडून उभे राहणार हे जवळपास नक्की असल्याचे क्लिअर होऊ लागले आहे. यामुळे नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरोधक एकवटत आहेत. साहजिकच निलेश लंके यांना हे सारे विखे विरोधी गट लोकसभा निवडणुकीत सहकार्य करणार आहेत.

निलेश लंके यांना आमदारकी सोडावी लागणार

खरेतर निलेश लंके अजितदादा यांच्या गटात आहेत. अशा परिस्थितीत जर त्यांना आगामी लोकसभा निवडणूक शरद पवार यांच्या गटाकडून लढवायची असेल तर यासाठी त्यांना सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. नाहीतर त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ शकतो अन या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

यामुळे हा पक्षांतर बंदी कायद्याचा अडसर दूर करण्यासाठी निलेश लंके यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड.भगीरथ शिंदे यांनीच ही माहिती दिलेली आहे. दुसरीकडे, निलेश लंके हे त्यांची पत्नी राणी लंके यांना या जागेवरून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे.

मात्र शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस निलेश लंके यांनाच या जागेवरून तिकीट देण्यास उत्सुक आहेत. यामुळे आता या जागेवरून निलेश लंके हे उभे राहतात की त्यांची पत्नी उभी राहते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe