कितीही विरोध तरी भाजप 400 पार लक्ष्य गाठणार? दिग्गज राजनीतीकार प्रशांत किशोर यांच्या विश्लेषणाने खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:
prashant kishor

देशभरात लोकसभा निवडणुकांचा हॅन्गओहर पाहायला मिळत आहे. एकूण सात टप्प्यांपैकी चार टप्पे झाले असून आणखी तीन टप्पे निवडणुकांचे राहिले आहेत. 20 मे रोजी यातील पाचवा टप्पा पार पडेल व यात यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये.

निवडणूक लागताच भाजपने 400 पारचा नारा दिला होता. त्या अनुशंघाने त्यांनी राजकीय नीती आखली होती. परंतु आता निवडणुकांच्या मध्यावर कुठेतरी भाजपची लाट कमी होताना दिसत असून स्थानिक पक्ष वरचढ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. यातच आता भाजप 273 चा आकडा देखील गाठू शकत नाही असा दावा विरोधक करतायेत.

आता मात्र राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी या लोकसभा निवडणुकांबाबत काही भाकीतं वर्तवली आहेत. त्यांच्या अंदाजानुसार भाजपला जवळपास 300 जागा मिळू शकतात असे म्हटले गेलेय. त्यांच्या म्हणण्यानुसार बंगाल, ओदिशा, तेलंगणा, तामिळनाडू व आंध्र या राज्यांमध्ये भाजपला फायदा होणार आहे. या राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढतील असा अंदाज त्याची व्यक्त केलाय.

एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, भाजपच्या कामगिरीबद्दल अनेक टिप्पण्या आणि वादविवाद सुरू असल्याचे दिसत असले तरी उत्तर व पश्चिमेतील भाजपच्या जागांमध्ये कोणतीही अर्थपूर्ण घट झाल्याचे दिसत नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधक मजबूत असल्याचे वक्तव्य देखील केले आहे.

परंतु त्याबरोबरच त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला विजयाचा दावेदार असे संबोधले आहे. त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, ओदिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश याठिकाणी भाजपला भाजपला पूर्वीपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवता येईल.

तसेच त्यांनी एनडीएने 400 जागा जिंकल्याचा भाजपचा दावा योग्य ठरलेला दिसत नसल्याचेही भाष्य केले. एकंदरीतच भाजप 400 पार जरी जाणार नसले तरी 300 पर्यंत चा आकडा गाठू शकते असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe