खोटं बोल पण रेटून बोल हा तर शरद पवारांचा धंदाच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी निलेश लंके विरुद्ध विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत रंगत आहे. ही लढत विखे विरुद्ध लंके अशी जरी भासत असली तरी देखील प्रत्यक्षात ही लढत विखे विरुद्ध शरद पवार अशीच आहे.

दरम्यान, याचीच प्रचिती आज आली आहे. खरेतर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार त्यांच्यात आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. जस की आपणास ठाऊकच असेल शरद पवार यांचे नेहमीच अहमदनगरकडे लक्ष राहिले आहे.

कारण की विखे घराणे आणि शरद पवार यांच्यात जवळपास 45 वर्षांपासून राजकीय वैर आहे. यामुळे नगर कडे शरद पवार यांचे नेहमीच लक्ष असते. यावेळी देखील त्यांनी लंके यांच्या प्रचाराला नगरमध्ये हजेरी लावली आहे. काल निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभा देखील घेतली होती.

यात पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवारांनी कालच्या सभेत असे म्हटले होते की, “एक उद्योगपती माझ्याकडे आला होता आणि त्या उद्योगपतीने मला असे म्हटले की, महसूलमंत्र्यांनी मला तुमच्याकडे पाठवले आहे, त्यांची विनंती आहे की तुम्ही निलेश लंके सोडून इतर कोणताही उमेदवार द्या.” दरम्यान याच संदर्भात आज महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या संदर्भात विचारणा केली असता विखे पाटील यांनी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या बोलण्याला मी फार महत्त्व देत नाही. परंतु खोटं बोल पण रेटून बोल हा तर शरद पवारांचा धंदाच झाला आहे, अशा शब्दात शरद पवारांवर प्रतिहल्ला चढवला आहे.

शिवाय महसूलमंत्र्यांनी पुढे बोलताना शरद पवारांनी इतर कोणाचीही चिंता करण्याऐवजी त्यांच्या कन्येची चिंता करावी असा खोचक टोलाही यावेळी लगावला आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नगरमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि टिका-टिप्पणीचे राजकारण गतिमान झाले आहे. विशेष म्हणजे नजीकच्या काळात आरोप-प्रत्यारोप आणखी वाढणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe