पवार परिवारात पुन्हा नाराजीनाट्य ! शरद पवार यांनी निलेश लंके यांच्याबाबत घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे रोहित पवार नाराज ?

Rohit Pawar On Nilesh Lanke

Rohit Pawar On Nilesh Lanke : लोकशाहीचा महाकुंभ आता खऱ्या अर्थाने सजला आहे. निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या असून आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल खऱ्या अर्थाने वाजले आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र इतर राज्याच्या तुलनेत राजकीय घडामोडी अधिक वेग घेत आहेत.

याचे कारण म्हणजे लोकसभा झाल्यानंतर लगेचच तीन ते चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले असून नगर दक्षिण मध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

खरेतर राज्यात महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही फायनल निर्णय झालेला नाही. परंतु काँग्रेसने आपल्या काही जागांवरील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

तर बीजेपीने देखील आपल्या महाराष्ट्रातील काही अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. बीजेपीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना किल्ला लढवण्याची जबाबदारी सोपवली आहे.

महाविकास आघाडीकडून मात्र या जागेवर कोण उभे राहणार ? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडे या जागेसाठी उमेदवार उपलब्ध नसल्याने त्यांनी आता महायुतीमधून उमेदवार आयात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांना या जागेवरून तिकीट दिले जाऊ शकते अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील आणि हाती तुतारी घेऊन सुजय विखे यांना आव्हान देतील अशा चर्चा आहेत. मात्र या डेव्हलपमेंटमुळे नगरचे पवार नाराज असल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांना साथ दिल्यामुळे नगरमधील पवार अर्थातच रोहित पवार नाराज असल्याचा मोठा दावा केला आहे.

हेच कारण आहे की, भाजप कार्यकर्त्यांनी यंदाची निवडणूक एकतर्फी होईल आणि सुजय विखे पाटील पुन्हा गुलाल उधळतील असा दावा केला आहे.

पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांच्या निलेश लंकेबाबतच्या भूमिकेमुळे खरंच रोहित पवार नाराज आहेत का ? हे नजीकच्या भविष्यातच क्लिअर होऊ शकणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe