शरद पवार गटाकडून 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कोण उभे राहणार ? पहा….

Tejas B Shelar
Published:
Sharad Pawar Candidate List

Sharad Pawar Candidate List : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे.

खरे तर आज सकाळी शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते अशी बातमी समोर आली होती. यानुसार आज पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये पाच उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. खरेतर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू होता.

मात्र आता जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण की, महायुती मधील आणि महाविकास आघाडी मधील मित्र पक्षांनी आता आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवार यांची पहिली यादी जाहीर केले असून यामध्ये नगर दक्षिणच्या उमेदवाराचे देखील नाव समाविष्ट आहे.

शरद पवार गटाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अधिकृतरीत्या निलेश लंके यांना तिकीट दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चा सुरू होत्या. निलेश लंके हे अजित दादा यांची साथ सोडतील, शरद पवार यांच्या गटात सहभागी होतील तसेच हाती तुतारी घेऊन लोकसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या.

आज अखेर या चर्चा अधिकृतरित्या खऱ्या ठरल्या आहेत असं म्हणावं लागेल. कारण की आज निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

यामुळे आता नगरचा लोकसभा मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी काटेदार लढाई पाहायला मिळणार आहे. दरम्यान आता आपण पक्षाने कोणत्या पाच अधिकृत उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष अधिकृत उमेदवारांची पहिली यादी 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ – निलेश लंके

वर्धा लोकसभा मतदारसंघ – अमर काळे

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ – भास्करराव भगरे

बारामती लोकसभा मतदारसंघ – सुप्रिमो शरद पवार यांची कन्या आणि खासदार रत्न सुप्रिया सुळे

शिरुर लोकसभा मतदारसंघ – अमोल कोल्हे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe