Sharad Pawar News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महायुती मधील मित्र पक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील मित्र पक्षांनी काही जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. अद्याप सर्वच जागांवर महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत.
परंतु लवकरच सर्व राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करणार आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर झाले आहेत तिथे आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेते आपल्या उमेदवारांसाठी प्रचाराला लागले आहेत. सध्या राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला बसले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार तथा त्यांच्या पक्षाने देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केलेली आहे.
अशातच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी शरद पवार यांच्याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी शरद पवार हे आजचे शिवाजी आहेत अन आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ असे विधान केले आहे. अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब या कार्यक्रमात खेडेकर बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांना शिवाजी महाराजांची उपमा दिलेली आहे.
त्यांनी या कार्यक्रमात बोलताना ‘संपूर्ण देशाला आवश्यक असलेला असा हा कार्यक्रम पुण्यात आयोजित झाला आहे. जागतिक तरुणाईचं आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. तुमची अस्वस्थता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा अडचण आली होती. या देशाचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र अडचणीत उभा राहिला आहे. आजचे शिवाजी साहेब झाले आहेत.
आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ, तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही एवढे आपल्या कृतीतून आपण दाखवून द्यावे’ असं विधान केले आहे. त्यामुळे खेडेकर यांच्या या विधानाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. तसेच त्यांनी पुण्यातून जो निवडून येतो त्याचे देशावर राज्य येते असे म्हटले.
यावेळी ते म्हटलेत की जेव्हा पुण्यातून कलमाडी आलेत तेव्हा युपीएच सरकार आलं, इथे बापट आले तेव्हा मोदी सरकार आले, जेव्हा शिरोळे आले होते तेव्हा अटल सरकार आले. यामुळे फक्त पुण्यात काम करून आपण देशात राज्य आणू शकतो. त्यांनी धंगेकर आले तर मोदी जातील आणि धंगेकर पडले तर मोदी येतील असे देखील यावेळी म्हटले आहे.
…तर मोदी नावाचा माणूस देशाला माहिती झाला नसता
यावेळी सप्तर्षी यांनी हिंदू आणि राम यांचा सुतराम संबंध नाही म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचा बिल्कुल संबंध नसल्याचे म्हटले आहे. ते म्हटलेत की, ‘हिंदु धर्म सहनशीलता, प्रेम, शेजारधर्म हे शिकवतो म्हणून आजपर्यंत सगळे मित्रत्वाने राहिले. हिंदुत्व म्हणजे हिंसा, द्वेष, दुसरे माणूसच नाहीत. मोदींना निवडून दिले म्हणून आपण पंतप्रधान मानतो परंतु मी त्याला पाहू शकत नाही.’
तसेच यावेळी त्यांनी गुजरात दंग्याबाबत बोलताना ‘आम्ही गुजरातमध्ये दंग्यानंतर काम करायला गेलो होतो. भट्टीमध्ये ८-८ माणसं टाकली. जर तो दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहिती झाला नसता,’ अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.