‘भाजप-राज’च ठरलं ! शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन मनसेचा ‘हा’ फायरब्रँड नेता निवडणुक लढणार ?

Tejas B Shelar
Published:
Shirdi Lok Sabha

Shirdi Lok Sabha : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. जागा वाटपावरून भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटात अजूनही फायनल फॉर्मुला ठरलेला नाहीये. अशातच मात्र महायुतीमध्ये आणखी एक नवीन पाहुणा इंट्री देणार असे भासु लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील समाविष्ट होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत राज यांच्या समवेत आगामी लोकसभेसंदर्भात शहा यांनी सविस्तर चर्चा केली आहे.

बंद दाराआड शहा आणि राज ठाकरे यांच्यात जागा वाटपावरून देखील चर्चा झाली असावी असा कयास बांधला जात आहे. विशेष म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे हे देखील दिल्ली वारीवेळी आपल्या वडिलांसमवेत अमित शहा यांना भेटले आहेत.

दरम्यान या बैठकीत अमित शहा यांनी राज यांना एक-दोन दिवसात शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्या समवेत बैठक घेऊन जागा वाटपावर फायनल निर्णय घेण्याचे सांगितले असल्याचे वृत्त समोर आले होते. यानुसार आज ठाकरे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक झाली आहे.

अशातच आता सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती समोर येत आहे की राज ठाकरे हे महायुतीमध्ये समाविष्ट होऊ शकतात. राज ठाकरे यांनी महायुती मध्ये समाविष्ट होण्यासाठी शिर्डीसह दोन जागांची मागणी केलेली आहे. खरेतर सध्या स्थितीला शिर्डीतुन सदाशिव लोखंडे खासदार आहेत. सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील असून त्यांनी दोनदा खासदारकी भूषवली आहे.

ही त्यांची दुसरी टर्म असून ते तिसऱ्या टर्म साठी सुद्धा इच्छुक आहेत. मात्र आता महायुतीमध्ये येऊ पाहणारा नवीन पाहुणा या जागेवर नजर लावून बसला आहे. विशेष म्हणजे भाजपा देखील ही जागा राज यांना देण्यासाठी सहमती दाखवणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाळा नांदगावकर यांना या जागेवरून उमेदवारी दिली जाऊ शकते अशा देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

तेव्हापासून या जागेवर शिवसेनेची मजबूत पकड आहे. मात्र शिवसेनेत आता उभी फूट पडली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या जागेवरील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेत. दरम्यान या जागेवर पुन्हा एकदा शिंदे यांच्या गटाने दावा ठोकला आहे.

आता मात्र राज ठाकरे यांची महायुतीमध्ये एन्ट्री होणार अशी शक्यता आहे. जर असे झाले तर त्यांच्यासाठी ही जागा सोडावी लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिले जाणार अशी शक्यता आहे.

जर असे घडले तर राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील उमेदवार आमने-सामने पाहायला मिळणार आहेत. यामुळे आता राज ठाकरे हे महायुतीत समाविष्ट होतात का आणि या जागेवरून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe