Ahmednagar Loksabha : निलेश लंकेंना सुजय विखे यांच आव्हान पेलवेना ! विखेंच्या साक्षर लोकप्रतिनिधी विषयावर लंकेची गरिबीची स्क्रिप्ट…

Tejas B Shelar
Updated:
Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : अहमदनगर दक्षिण मध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे उभे आहेत. निलेश लंके यांनी नुकताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असून त्यांनी सुजय विखे यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, निलेश लंके यांना सुजय विखे यांचे आव्हान खरच पेलवणार का हा मोठा सवाल आता उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच वर्षात सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. बारा वर्षांपासून रखडलेला उड्डाणपूल, दहा वर्षांपासून रखडलेली पाणी योजना, अनेक वर्षांपासून रखडलेला आयुष हॉस्पिटलचा प्रश्न, शहरातील बायपासचा प्रश्न, विविध रस्ते विकासाची कामे सुजय विखे पाटील यांनी केली असून या कामांचे ते यंदाच्या निवडणुकीत भांडवल करण्याच्या तयारीत आहेत.

किंबहुना याचा त्यांना फायदाच होणार आहे. यामुळे स्वतः सुजय विखे पाटील यांनी कित्येकदा जर विकासाच्या मुद्द्यावर यंदाची निवडणूक होणार असेल तर नगर दक्षिणमध्ये निवडणूक घेण्याची गरजच नसल्याचे म्हटले आहे. अर्थातच सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणमधून निवडणुकीबाबत पूर्णपणे आश्वस्त आहेत. दरम्यान आता सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना एक चॅलेंज दिले आहे. त्यांनी लंकेंना एका महिनाभरात माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, भलेही यासाठी महिनाभर वेळ घ्यावा, तसेच पाठ करून मी आत्तापर्यंत जें माझ्या भाषणांमध्ये इंग्रजी बोलतो तेवढे बोलून दाखवावे असे चॅलेंज दिले आहे. शिवाय जर निलेश लंके यांनी असे केले तर मी निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही असे यावेळी त्यांनी म्हटले आहे. यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात आता दोन्ही उमेदवारांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुजय विखे पाटील उच्चशिक्षित उमेदवार

सुजय विखे पाटील यांना जेव्हा 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा उमेदवारी दिली तेव्हा ते काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षात आले होते. मात्र असे असतानाही भाजपाने त्यांना तिकीट दिले. यामागे अनेक कारणे आहेत. यातील पहिल कारण म्हणजे विखे घराण्याचा नगरच्या राजकारणातला राजकीय वारसा. त्यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना अर्थातच प्रवरा साखर कारखाना सुरू केला होता. प्रवरा साखर कारखाना ओपन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने नगरची सहकार क्षेत्रात आगेकूच सुरू झाली. यामुळे विठ्ठलराव विखे पाटील यांना नगरचे विकास पुरुष म्हणून उपाधी देण्यात आली होती. दरम्यान त्यांचा हा वारसा बाळासाहेब विखे पाटील यांनी यशस्वीरित्या चालवल्यानंतर आता विठ्ठलरावांचे नातू महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पणतू अर्थात सुजय विखे पाटील हे हा वारसा यशस्वीरित्या चालवत आहेत.

दरम्यान विखे घराण्याच्या याच कार्याची दखल घेत भाजपाने गेल्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस मधून आलेले असतानाही तिकीट दिले होते. याशिवाय सुजय विखे हे एक तरुण आणि सुशिक्षित राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जाते. ते एक न्यूरोसर्जन आहेत. ते डॉक्टर तर आहेतच शिवाय एक सभ्य राजकारणी म्हणून त्यांची संपूर्ण जिल्हाभर असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण राज्यभर ओळख आहे आणि लोकसभेत देखील याची वेळोवेळी प्रचिती आली आहे. त्यांनी लोकसभेत सातत्याने आपल्या मतदारसंघातील आणि राज्यातील नागरिकांचे प्रश्न उपस्थित करून सरकारसोबत झगडून ते प्रश्न निकाली काढण्यात यश मिळवलेले आहे. यामुळेच या निवडणुकीत पुन्हा एकदा सुजय विखे यांना भाजपाने तिकीट दिलेले आहे. सुशिक्षित युवा उमेदवार म्हणून सुजय विखे यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा निवडणुकीत उतरवले आहे.

अशातच आता सुजय विखे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. निलेश लंके यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले आहे आणि आयटीआय केलेला आहे. दुसरीकडे सुजय विखे पाटील हे उच्चशिक्षित आहेत. ते न्यूरोसर्जन आहेत. दरम्यान सुजय विखे पाटील यांनी मी जशी इंग्लिश बोलतो तसे जर समोरच्या उमेदवाराने बोलून दाखवली तर मी उमेदवारीचा फॉर्म भरणार नाही असे म्हणून नगरच्या जनतेपुढे निलेश लंके यांचा शिक्षणाचा प्रश्नच उपस्थित केला आहे. यावरून सध्या तरी सुजय विखे पाटील हे लोकसभेच्या ग्राउंडवर जोरदार बॅटिंग करत आहेत अस दिसत आहे. यामुळे निलेश लंके यांना सुजय विखे पाटील यांचे आव्हान पेलवणार का हा मोठा प्रश्न आहे.

सुजय विखे यांच्या चॅलेंजवर काय म्हणतात लंके

यावर उत्तर देताना निलेश लंके यांनी पुन्हा एकदा गरीब विरुद्ध श्रीमंत अशीच टॅग लाईन वापरली आहे. लंके यांनी, ‘समोरच्या उमेदवाराला पैशाची मस्ती आहे. एका बाजूला सांगायचं की जे सक्षम आहे त्यांनीच राजकारण करायचं, दुसरीकडे सांगायचं निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही. पण मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही, असे यावेळी म्हटले आहे. खरेतर निलेश लंके यांनी स्वतःला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून संबोधले आहे. पण ते तर एका शिक्षकाच्या घरी जन्माला आले आहेत. यामुळे लंके हे साफ खोटे बोलत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.

5 वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती

दुसरीकडे सध्याचा घटनाक्रम पाहता पाच वर्षांपूर्वी नगरमध्ये जें घडलं होत तेच पुन्हा एकदा घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. खरे तर पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यावेळी निलेश लंके हे शिवसेनेत होते. तेव्हा पारनेरचे तत्कालीन आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पारनेर दौर्‍यावर आले होते. त्या कार्यक्रमाच्या नियोजनात मात्र तत्कालीन पारनेरचे आमदार औटी यांनी नीलेश लंके यांना बाजूला सारले. शिवसेना तालुकाप्रमुख असतानाही लंके यांना औटी व त्यांच्या समर्थकांनी फुटेज दिले नाही. दरम्यान यातुनच त्यांनी औटी समर्थकांनी आपली व आपल्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली असा कांगावा केला. प्रत्यक्षात स्वत:च्याच कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती.

यातून नीलेश लंके यांनी त्यांच्यावर औटी यांनी कसा अन्याय केला यासह औटी यांची मग्रुरीची, उद्धटपणाची वागणूक दाखवून सहानुभूतीचे राजकारण करत मतदार संघातील जनतेला त्यांनी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी दगडफेक स्वतः घडवून आणली. म्हणजेच एक खोटी स्क्रिप्ट त्यांनी रचली. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काढलेल्या संवाद यात्रेत गावोगावी जाऊन लोकांना औटी विरोधात भडकवले. खरेतर, औटी यांच्याकडून दुखावल्या गेलेल्या, अपमान झालेल्या नाराज कार्यकर्त्यांची संख्या पारनेर मतदार संघात गावागावात होती यात शन्काच नाही. पण, औटी यांनी त्यांच्या मतदारसंघात उल्लेखनीय विकास कामे केली होती. विकास कामांवरून औटी यांना टार्गेट करता येणे अशक्य होते. यामुळे लंके यांनी त्यावेळी त्यांच्या म्हणजे औटी यांच्या स्वभावाचे, अपमानास्पद वागणुकीचे मुद्दे मतदारसंघातील जनतेपुढे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे नियोजित पद्धतीने मांडले.

आता औटी यांच्या कामामुळे जरी कार्यकर्ते तथा मतदार नाराज नसले तरीदेखील त्यांचा स्वभाव हा अनेकांना आवडत नव्हता यामुळे गावोगावच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना निलेश लंके यांचे हे स्क्रिप्टेड मुद्दे पसंत पडलेत. आता लोकसभेच्या मैदानात देखील निलेश लंके हाच स्टंट वापरणार आहेत. ते हाती शरद पवार यांची तुतारी घेऊन औटी यांच्या विरोधात जे मुद्दे मांडले तेच मुद्दे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या विरोधात देखील मांडणार आहेत. मात्र सुजय विखे पाटील यांची यंत्रणा ही त्यांच्यासाठी अंडरकव्हर आर्मीसारखी काम करते. यामुळे औटी यांच्या विरोधात लंके यांची रणनीती यशस्वी ठरली होती, पण विखे हे नगरच्या राजकारणातील चाणक्य आहेत आणि त्यांच्यापुढे लंके यांची ही रणनीती चालणार नसल्याचे भासत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe