अहमदनगर ब्रेकिंग : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी ! आ.निलेश लंके समर्थकांचा खरा चेहरा समोर…

Sujay Vikhe Patil News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे नगरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. अजून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही. मात्र महायुतीकडून या जागेवरून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या जागेवर आयात केलेले उमेदवार निलेश लंके यांना संधी दिलेली आहे.

खरे तर निलेश लंके आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष हा संपूर्ण नगर जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. दरम्यान हा राजकीय संघर्ष उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच आता टोकाला पोहोचला असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यात सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

ही ऑडिओ क्लिप माजी पंचायत समिती सदस्य तथा निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचे अध्यक्ष निवृत्ती गाडगे उर्फ नाना आणि पारनेर तालुक्यातील कळस गावातील माजी उपसरपंच गणेश काने यांच्यातल्या फोनवर झालेल्या संवादाची आहे. यामध्ये विखे यांच्या विजयाचा अंदाज सांगणाऱ्याला कळस गावातील माजी उपसरपंच गणेश काने यांना शिव्या दिल्या गेल्या आहेत.

एवढेच नाही तर त्यांना धमकीही देण्यात आली आहे. हा फोन लंके यांच्या मीडिया सेल मधूनच लावला गेला. यामुळे हे प्रकरण खूपच धक्कादायक असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार माजी उपसरपंच गणेश काने यांनी सुजय विखे पाटील हेच विजयी होतील असे एका मुलाखतीत म्हटले होते. मीडियाला दिलेल्या या बाईटमुळे निलेश लंके समर्थक अन लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचे अध्यक्ष निवृत्ती गाडगे मात्र कमालीचे संतापलेत आणि त्यांनी याचबाबत जाब विचारण्यासाठी माजी उपसरपंचाला फोन केला. यात गाडगे यांनी सुजय विखे यांच्या विजयाचा अंदाज का वर्तवला असा जाब विचारला आहे.

तसेच माजी उपसरपंचाला शिव्या आणि धमक्या दिल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासाठी गाडगे यांनी शिवराळ भाषेचा वापर केलेला आहे. तसेच विखे यांना गोळ्या घालण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या आहेत. यामुळे ही ऑडिओ क्लिप सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यात वायरल होत आहे.

तसेच याबाबत विखे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राजकीय वर्तुळात या ऑडिओ क्लिपची मोठी चर्चा असून लवकरात लवकर धमकी देणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विखे यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. विखे यांच्या समर्थकांनी याबाबत निवडणूक अधिकारी, पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

याविरोधात सुजय विखे पाटील यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. एकंदरीत अजून उमेदवारी अर्ज देखील भरला गेलेला नाही आणि अशातच नगर दक्षिण मधील राजकारण कमालीचे तापले असून जीवे मारण्याची धमकी देखील दिली जाऊ लागली आहे.

विशेष म्हणजे विद्यमान खासदाराला आणि एका पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने प्रशासनाला याबाबतीत विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता या प्रकरणात निवडणूक आयोग काय कारवाई करते आणि पोलीस काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe