यंदा पुन्हा सुजय विखे पाटील हेच खासदार होणार, 5 लाखांचे लीड मिळणार; सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांना विश्वास

Sujay Vikhe Patil News : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. खरे तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघ नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

यंदाच्या निवडणुकीत देखील अहमदनगर कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या जागेसाठी महायुतीने सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा तिकीट दिले आहे आणि महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना तिकीट दिले आहे.

महायुतीने आणि महाविकास आघाडीने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी धनश्री विखे पाटील यादेखील मैदानात उतरल्या आहेत.

सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी धनश्री विखे या स्वतः मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केली आहे.

दरम्यान धनश्री विखे पाटील यांनी प्रचाराच्या वेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी सुजय विखे पाटील हेच पुन्हा एकदा खासदार होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

धनश्री विखे पाटील यांनी, ‘अहमदनगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचाच विजय होणार आहे. केवळ मलाच नाही तर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना असाच विश्वास आहे.

गेल्या निवडणुकीत अर्थात 2019 च्या निवडणुकीत तीन लाखांचे लीड होते यंदा मात्र पाच लाखांचे लीड मिळेल,’ असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. पुढे बोलताना धनश्री विखे पाटील यांनी विद्यमान खासदारांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

त्यांनी, ‘गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरच्या उड्डाणपुलाचे काम असो की नितीन गडकरींच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच महामार्गाची काम असो सुजय विखेंनी जनतेला अपेक्षित जवळपास सर्वच काम पूर्ण केली आहेत त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे,’ असे म्हटले आहे.

एकंदरीत सुजय विखे यांच्या प्रचारासाठी भाजपा अन महायुतीचे मित्र पक्षांमधील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी तर मेहनत घेतच आहेत शिवाय आता त्यांची पत्नी देखील मैदानात उतरली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण नगरच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा पाहायला मिळतं आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe