Maharashtra News : लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरु झाली असतानाच अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. परंतु याच निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जवळचा असणारा नेता अर्थात आ. एकनाथ खडसे भाजपात जाण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ऑक्टोबर 2020 ला विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीत ते आले होते व राष्ट्रवादीनेही त्यांना विधानपरिषदेवर आमदार केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर ते आता भाजपात जाणार हे फिक्स झालं असल्याचे माहिती मिळाली आहे. शरद पवार यांची जळगाव जिल्ह्याच्या निवडणुकांची भिस्त खडसे यांच्यावर होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये येणारे असून त्यांची कन्या रोहिणी खडसे या मात्र राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत म्हटले आहे की, एकनाथ खडसे पुन्हा 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करतील. म्हणजे उद्या किंवा परवा ते पुन्हा भाजपवासी होतील.
रोहिणी खडसे यांची वेगळी भूमिका
एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची लेक रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलं असून रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचे यातून स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या महिला संघटनेच्या त्या सध्या अध्यक्ष आहेत.
शरद पवार यांना धक्का
आगामी निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात आ.एकनाथ खडसे यांच्यावर निवडणुकीची भिस्त होती. परंतु आता ते भाजपात गेल्यामुळे शरद पवार यांना मोठा हा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात ते काय राजकीय गणिते आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,