अहमदनगर ब्रेकिंग : विवेक कोल्हे लढविणार ही मोठी निवडणूक ! आमदार होणार ?

Tejas B Shelar
Published:
Vivek Kolhe News

Vivek Kolhe News : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत चार टप्प्यात मतदान पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे 2024 ला होणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतदान मात्र पूर्ण झाले आहे. या मतदार संघातील मतदाराजांनी आपल्या खासदाराची निवड पूर्ण केली असून आता याचा निकाल चार जूनला समोर येणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच नगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. को

परगावातील भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा आज मोठा निर्णय घेतलेला आहे. नासिक शिक्षक मतदार संघात उमेदवारी करण्याचा मोठा निर्णय आज बीजेपीचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी घेतला असून सध्या नगरच्या राजकारणात याची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा देखील मैदानात उतरवला आहे. लांबलेल्या निवडणुकीचा फायदा उचलण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजपाटा या आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी कामाला लावला असल्याचे म्हटले जात आहे.

यामुळे नगरच्या उत्तरातील राजकारणाला एक नवीन वळण आलं आहे. खरे तर विवेक कोल्हे आणि विखे कुटुंब यांच्यात शीतयुक्त सुरू आहे ही गोष्ट कोणापासून लपून राहिलेली नाही. कोल्हे यांनी विखे यांचा कडाडून विरोध केला आहे. मध्यंतरी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मोर्चा देखील काढला होता. विखे विरोधी व्यासपीठांवर नेहमीच विवेक कोल्हे यांचे हजेरी पाहायला मिळाली आहे.

ते विखे यांचा उघड-उघड विरोध करतात. विशेष म्हणजे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना जर तुम्ही आमची अडवणूक केली तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मी निवडणुकीसाठी उभा राहीन असा इशाराही दिला होता. खरे तर कोल्हे आणि विखें यांच्यातील हे शीतयुद्ध गेल्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे. त्याचं झालं असं की विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून उभ्या होत्या.

मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना तिकीट दिले आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात इंट्री घेतले.

मात्र विखे पिता पुत्र भारतीय जनता पक्षात आल्यानंतर पक्षाला विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका बसला. कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे आणि कोपरगाव मतदार संघात स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला. या पराभवाचे पराभूत उमेदवारांनी विखे पिता पुत्रांवर खापर फोडले. विखे पिता पुत्र भारतीय जनता पक्षात आल्यानंतर पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झालेत आणि यामुळेच त्यांचा पराभव झाला असा आरोप पराभूत उमेदवारांनी केला.

यामुळे नाराज नेत्यांनी याची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तेव्हापासून आमदार राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून विखें पीता पुत्रांचा विरोध सुरू आहे. तथापि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराआधी राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यात विखे यांना यश आले आहे. नाराजी दूर झाल्यानंतर रामाभाऊंनी पूर्ण ताकतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार देखील केला आहे.

मात्र विवेक कोल्हे यांची नाराजी दूर झाली आहे की नाही हे त्यांनाच ठाऊक आहे. अशातच आज विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषद निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. खरे तर सहकाराच्या राजकारणात कोल्हे परिवार हा माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ताकतवर नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आहे. दुसरीकडे राज्याच्या सक्रिय राजकारणात कोल्हे परिवार हा भारतीय जनता पक्षाच्या अन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे.

कोल्हे परिवार हा देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये येतो. यामुळे नाशिक शिक्षक मतदार संघाची आगामी निवडणूक ही आमदार किशोर दराडे विरुद्ध युवा नेते विवेक कोल्हे यांच्यात रंगणार का? हे पाहण्यासारखे राहणार आहे. तथापि आज विवेक कोल्हे यांनी विधानपरिषद निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून यामुळे याकडे नगरच्या राजकारणातील एक मोठी घडामोड म्हणून पाहिलं जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe