अहमदनगर लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली. यामागे अनेक कारणे होती. त्यातील महत्वाचे म्हणजे निलेश लंके – खा.सुजय विखे यांची टाइटफाईट. हा सामना अस्तित्वाची – प्रतिष्ठेची लढाई असा देखील चर्चीला गेला. एकंदरीतच या निवडणुकीत विखेंइतकेच ग्लॅमर लंके यांना देखील मिळाले.
परंतु आता येत्या ४ तारखेला जय पराजय या गोष्टी सर्वांसमोर येतीलच. परंतु सध्या निलेश लंकेंचे राजकीय भविष्य काय असणार अशा चर्चा लोक करायला लागले आहेत. अजित पवार यांची नाराजकी, विखे यांचा राजकीय विरोध आणि ईव्हीएममधील जनमत यात सध्या लंके अडकले आहेत. निलेश लंके जर विजयी झाले तर काय आणि पराजित झाले तर काय याबाबत आता ही पारावरची मंडळी विश्लेषण करायला लागलीय. आपण या ठिकाणी सर्वच शक्यता पडताळून पाहू –
निलेश लंके विजयी झाले तर निलेश लंके यांचा राजकीय सुवर्णकाळ असेल असे ही मंडळी चर्चा करत आहेत. पुढे तालुक्यात व एकंदरतीच मतदारसंघातही लंके सांगतील ती पूर्व दिशा असेल.
नगर शहर व ग्रामीण भागातही निलेश लंके यांचे राजकीय वलय वाढत जाईल अशी चर्चा हे लोक करत आहेत. त्यांचे समर्थक व कार्यकर्ता वर्गही वाढत जाईल व समृद्धही होईल असेही लोक म्हणतायेत.
पण जर त्यांना अपयश आले तर मग राजकीय संघर्ष शून्यातून सुरू करावा लागेल व तो खडतर असेल अशी चर्चा ही मंडळी करत आहेत. त्याचे कारण असे की, लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवताना महायुतीचे दोर स्वतःहून कापून टाकले आहेत.
त्यामुळे लंकेचे राजकीय आयुष्य पणाला लागले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाले तर पुढे तालुक्यात सांगेल ती पूर्व दिशा असेल, पण अपयश आले तर मग राजकीय संघर्ष शून्यातून सुरू करावा लागेल व तो खडतर असेल अशी चर्चा हे लोक करत आहेत.
महायुतीशी दोर तोडताना त्यांनी अजित पवार यांना देखील दुखावले आहे. तसेच विखे घराण्याशी देखील टोकाचा राजकीय संघर्ष केलेला आहे. त्यामुळे जर अजित दादांची नाराजगी कायम राहिली तर पारनेरमधील राजकीय समीकरणे बदलू शकतील हे देखील खरे.
तसेच पारनेरला आता आमदार नसल्याने पालकमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील येथे लक्ष घालू शकतील असे स्वतः अजित दादांनी आपल्या सभेत म्हटले. टोकाचे राजकारण लक्षात घेता विखे पाटील पारनेर तालुक्यात अधिक लक्ष घालतील व लंके यांचा राजकीय संघर्ष अधिक संघर्षमय बनेल असेही हे लोक म्हणत आहेत.
विधानसभेसाठी नवी समीकरणे जुळविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण जर येत्या ४ जूनला निलेश लंके यांना विजयाची लॉटरी लागली तर मात्र मतदारसंघात लंके सांगतील ती पूर्व दिशा असेल त्यांचा सुवर्णकाळ असेल असेही हे लोक चर्चा करत आहेत.