महाराष्ट्र भाजपच्या हातून गेल्याने मोठी उलथापालथ होणार, राज्याला नवे नेतृत्व मिळेल? भाजप नेत्यांकडून केंद्राला गोपनीय अहवाल? वाचा..

Ahmednagarlive24 office
Published:
modi

लोकसभेच्या निकालासंदर्भात जे Exit Poll आले आहेत त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला फटका बसेल असे चित्र आहे. महाविकास आघाडीला यावेळी जास्त फायदा होताना दिसेल असे दिसत आहे. महाविकास आघाडीला 20 ते 22 जागा तरी मिळू शकतील असे काही अंदाज सांगत आहेत.

जर आपण TV9 पोलस्ट्रेटचा सर्व्हे पहिला तर त्यांच्या पोलनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला 18, शिंदे गटाला 4, अजितदादा गटाला 0 जागा मिळतील असे दाखवत आहे. महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी (शरद पवार गट ) 6 आणि ठाकरे गटाला 14 जागा अशा पद्धतीच्या जागा दाखवत आहे.

परंतु आता हे विविध पोल समोर येण्याआधीच भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला गोपनीय अहवाल पाठवला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या अहवालामध्ये महाराष्ट्रात नेतृत्वबदलाविषयी भाष्य करण्यात आले असून महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश जर मिळाले नाही तर नेतृत्व बदलाची शिफारस करण्यात आली आहे असे एक वृत्त एका मीडियाने दिले आहे.

लोकसभा पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल व शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक जिंकणे अवघड असल्याची भीती या अहवालात व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे.

एकंदरीत जर देशाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या निवडणुकांना राजकीय पटलावर जास्त महत्व आहे. उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात असल्याने येथील जयविजयाची गणिते सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका बजावत असतात. मागील विधानसभेला भाजप शिवसेना युतीने 41 चा आकडा पार केला होता

परंतु यावेळी हा आकडा 27 ते 30 पर्यंत येण्याची शक्यता पोल मधून दिसते. आता यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुक जर लढवली गेली तर भाजपला सर्वाधिक फटका बसू शकतो असा एक अंदाज या अहवालात दिला असल्याची देखील चर्चा आहे.

त्यामुळे आता राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली असून 4 जूनच्या निकालानंतर महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe