Amitabh Bachchan Birthday : बॉलिवूडचे शहेनशहा कोण ? अर्थात अमिताभ बच्चन ! हे कुणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. अमिताभ बच्चन पाहता पाहता ८१ वर्षांचे झालेत. आज त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा होत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री प्रचंड गर्दी झाली होती.
अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतील जलसा बंगल्याबाहेर गर्दी केली होती. बंगल्यातून बाहेर पडताच अमिताभ बच्चन यांना चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. बीग बी न चुकता वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना भेट देतातच. १९७१ मधील आनंद आणि १९७५ मधील शोले या चित्रपटांपासून बिग बींची जादू सुरु झाली ती आजपर्यंत टिकून आहे.

अमिताभ आणि जया यांच्याकडे किती सोने-चांदी आहे?
अमिताभ बच्चन यांना अस्सल सोने-चांदी जास्त आवडते. अमिताभ बच्चन यांच्याकडे २ कोटी रुपयांचे सोने आणि ५ कोटी रुपयांची चांदी आहे. त्यांच्याकडे २८ कोटी रुपयांचे दागिने आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सुमारे ३५ कोटी रुपयांची भक्कम मालमत्ता आहे. अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याकडे २ कोटी रुपयांचे सोने, ८९ लाख रुपयांचे चांदीचे साहित्य, ७० लाख रुपयांच्या चांदीच्या विटा आणि २२ कोटी रुपयांचे दागिने आहेत.
अमिताभ यांचा बँक बॅलन्स
अमिताभ बच्चन यांच्या दागिन्यांच्या मालमत्तेबद्दल तर पहिले. पण तुम्हाला माहित आहे का अमिताभ बच्चन यांनी पॅरिसच्या बँकांमध्ये पैसे जमा केले आहेत आणि त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची बँक बॅलन्स आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबई आणि फ्रान्समधील विविध बँकांमध्ये एकूण ४७ कोटी ७५ लाख ९५ हजार ३३३ रुपये बॅलन्स आहेत.
प्रॉपर्टी
अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबईशिवाय परदेशातही अनेक मालमत्ता आहेत. अमिताभ बच्चन यांनी नुकताच मुंबईत ५,७०४ चौरस फुटांचा डुप्लेक्स अपार्टमेंट ३१ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. ही मालमत्ता ३१ डिसेंबर २०२० रोजी खरेदी करण्यात आली होती, १२ एप्रिल २०२१ रोजी नोंदणी करण्यात आली होती.
अमिताभ बच्चन यांचे अनेक बंगले आहेत. ते जुहूयेथील जलसा बंगल्यात राहतात. अमिताभ बच्चन यांनी निर्माता एनसी सिप्पी यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता. हा बंगला १०,१२५ स्क्वेअर फुटांचा आहे. जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल जुहूजवळ हा २ मजली बंगला आहे. बच्चन यांनी जलसाच्या मागे आणखी आठ हजार चौरस फुटांची मालमत्ता खरेदी केली आहे. २०१३ मध्ये त्याची किंमत ५० कोटी रुपये होती.
अमिताभ बच्चन यांचे कार्यालय जनक बंगला येतेच आहे, जो त्यांनी २००४ मध्ये ५० कोटी रुपयांना खरेदी केला होता. ते अनेकदा जावई अगस्त्य नंदा यांच्यासोबत येथे दिसतात. प्रतीक्षा हा बंगला देखील जुहूमध्येच आहे. या घरात अमिताभ बच्चन यांचे आई-वडील राहत होते. हे घर बच्चन कुटुंबाने १९७६ मध्ये विकत घेतले होते. वत्स हा बंगलाही जुहू येथेच आहे, जो अमिताभ बच्चन यांनी सिटी बँक इंडियाला भाड्याने दिला आहे. यासोबतच अनेक अपार्टमेंट देखील आहेत ज्याची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे.