Bigg Boss 17 : सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ संपण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे हा सीझनही वाद आणि मारामारीमुळे लक्षात राहील. मंगळवार, ‘वीकेंड का वार’ मध्ये नुकताच अभिनेत्री अंकिताचा पती विकी जैन शोमधून बाहेर पडला आहे आणि यासोबतच ‘बिग बॉस 17’चे टॉप फाइव्ह स्पर्धकही समोर आले आहेत.
यामध्ये अंकिता लोखंडे, अरुण माशेट्टी, मुनावर फारुकी आणि अभिषेक कुमार यांच्यासह मनारा चोप्राने देखील टॉप फाइव्हमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ‘बिग बॉस’च्या शेवटच्या एपिसोडमध्ये मनारा खूप रडताना दिसली होती. मनाराला असं तुटताना पाहून तिची बहीण अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता तिला प्रोत्साहन देताना दिसत आहे.

‘बिग बॉस 17’ मधील मनारा चोप्राचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. शोच्या सुरुवातीला मनाराची मुन्नावरशी मैत्री झाली, पण परस्पर गैरसमजांमुळे त्यांची मैत्री तुटली. त्यानंतर मनारा विकी जैनसोबत मैत्री करताना दिसली, पण मनारा आणि विकी यांच्यातील मैत्रीवर अंकिता पूर्णपणे नाराज होती. अंकिताने शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये मनाराला अनेक शब्द सुनावले. इतकेच नाही तर ‘बिग बॉस 17’ च्या पत्रकार परिषदेदरम्यानही मन्नाराला पत्रकारांच्या तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. या सगळ्या गोष्टींमुळे मनारा खूप दुखावली गेली.
बिग बॉसच्या शेवटच्या एपिसोडमध्ये मनारा चोप्रा रडताना दिसली होती. मनारा रडत रडत शोचा दुसरा स्पर्धक अरुणला सांगत होती, ‘मला इथे अजिबात चांगले वाटत नाही. मला इथे राहायचे नाही, मला घरी जायचे आहे. आपल्या धाकट्या बहिणीला असे तुटताना पाहून बॉलिवूडची सुपरस्टार प्रियांका चोप्राने तिची हिंमत वाढवली आहे. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून मनाराचा एक सुंदर फोटो शेअर करताना लिहिले की, ‘तुम्ही फक्त जिंकण्यावर लक्ष केंद्रित कर आणि तुझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कर, इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नको.’
मनारा ही चोप्रा कुटुंबाची लाडकी लेक आहे. ‘बिग बॉस’च्या घरात जेव्हा-जेव्हा मनारा एकटी किंवा दुःखी दिसली, तेव्हा संपूर्ण चोप्रा कुटुंब तिच्या समर्थनासाठी बाहेर पडले. नुकतेच विकी जैनने मनारा चोप्राला शिवीगाळ केली होती तेव्हा प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रानेही मनाराला पाठिंबा दिला होता.