Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला वाटत आहे पती विकी जैनच्या आईला भेटण्याची भीती; म्हणाली, “कसं तोंड दाखवू….”

Published on -

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे, काही दिवसातच बिग बॉस 17 च्या विनरचे नाव घोषित केले जाईल, शो दिवसेंदिवस मजेदार होत चालला आहे. बिग बॉस 17 च्या घरात असलेले जोडपे अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन हे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरु झाली आहे.

अंकिता आणि विकीच्या सततच्या सुरु असलेल्या भांडणामुळे कुटुंबीयांसह प्रेक्षकही वैतागले आहेत. अशा परिस्थितीत अंकिता लोखंडेने आता या शोनंतर एका व्यक्तीला भेटण्याची भीती व्यक्त केली आहे, कोणती आहे ती व्यक्ती चला जाणून घेऊया..

बिग बॉस 17 च्या एका एपिसोडमध्ये अंकिता (अंकिता लोखंडे) विकीशी बोलताना म्हणाली, ‘तुला काय वाटतं, मी तुझ्या घराशी जुळवून घेतले नाही? मी कधी दिखावा केला नाही, तुमच्या समाजात जाऊन मी सर्व काही, प्रेमाने, मान्यतेने आणि मनापासून केले. मला सोबत घेऊन जायला आईंना अभिमान वाटला नाही? ज्यावर विकी जैन म्हणतो की, घरच्यांनी त्या वागण्यामुळे स्वीकारलं आणि आता ते आपल्यावर रागावले असतील तर ते देखील आपल्या वागण्यामुळेच.

पुढे अंकिता म्हणते, शो संपल्यानंतर मी आईचा (विकीची आई ) सामना कसा करणार? हा प्रश्न मला सध्या पडला आहे, त्यांनी इतकी मोठी विधाने केली की त्यांना कसे सामोरे जावे हे मला कळत नाही. त्या माझ्यावर खूप नाराज आहेत त्यामुळे त्यांना काय बोलावे हे मला कळत नाही. खरंच, मला भीती वाटते. मला ते जाणवत आहे.” खरं तर, काही काळापूर्वी विकी जैनच्या आईने मीडियामध्ये सांगितले होते की, तिचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते, ज्यावरून हा वाद बराच पेटला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe