Bigg Boss 17 : फिनालेपूर्वीच अंकिताचा पती विकी जैन शोमधून बाहेर, खरी ठरली ‘या’ स्पर्धकाची भविष्यवाणी !

Published on -

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या फिनालेसाठी आता फक्त 5 दिवस उरले आहेत. फिनालेपूर्वीच अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार आहे. विकीच्या फॅन क्लबमध्ये सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, याबाबत अधिकृत वक्तव्य येणे बाकी आहे.

विकी जैन जेव्हा बिग बॉसच्या घरात आला तेव्हा लोक त्याला अंकिता लोखंडेचा नवरा म्हणून ओळखत होते. पण विकीने आपल्या खेळाने प्रेक्षकांसोबतच बिग बॉसलाही आश्चर्यचकित केले. विकीने लोकप्रिय YouTubers आणि कलाकारांमध्ये स्वतःला सिद्ध केले. पब्लिक असो की सेलेब्स, सगळेच त्याचे फॅन झाले आहेत. या शोच्या टॉप 5 फायनलिस्टपैकी विकी एक असेल असे मानले जात होते. पण तसे झाले नाही. निर्मात्यांनी विकीला फिनालेच्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे.

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात डबल एलिमिनेशन झाले. आयशा खाननंतर ईशा मालवीय शोमधून बाहेर पडल्या. यानंतर अरुण, मुनव्वर, अंकिता, मनारा, विकी आणि अभिषेक हे फिनालेच्या टॉप 6 स्पर्धकांमध्ये सामील झाले. पण बिग बॉसला फिनालेपूर्वी शोमध्ये ट्विस्ट आणावा लागला. म्हणूनच त्यांनी आठवड्याच्या मध्यावर घरातून एक सदस्य बाहेर करण्याचे आयोजन केले. यावेळी विकीला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

पण विकीला स्वत:बद्दल खूप विश्वास होता. त्याला वाटले की तो जिंको अथवा न जिंको, तो अव्वल ५ मध्ये नक्कीच आपले स्थान निश्चित करेल. पण काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात विकी आणि मुनव्वर यांच्यात जोरदार भांडण झाले होते. या भांडणात मुनव्वरने विकीला ‘टनल’ पर्यंत सोडेल असे सांगितले होते, यापूर्वी मुनव्वरने हेच वक्त्यव्य समर्थसाठी देखील केले होते. मुनव्वरने याआधी केलेलं व्यक्तव्य खरे ठरले असून, विकीही आता शो मधून बाहेर जाणार असल्याची चर्चा आहे.

अंकिता लोखंडे देखील विकीच्या एलिमिनेशनचे कारण असल्याचे बोलले जात आहे. वृत्त आहे की, निर्मात्यांना अंकिता आणि विकीची मते फिनालेमध्ये विभागली जाऊ इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांनी विकीला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe