Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या अंतिम फेरीसाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. लवकरच तो ऐतिहासिक दिवस येणार आहे जेव्हा सीझन 17 चा विजेता मिळेल. अशा परिस्थितीत फिनालेपर्यंत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा दिसून येत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरातील आयशा खान आणि ईशा मालवीयाचा प्रवास संपुष्टात आला आहे. आता या शोला 6 फायनलिस्ट मिळाले आहेत.
बिग बॉसमध्ये सध्या मुनव्वर फारुकीचा खेळ प्रेक्षकांना खूप भावत आहे. अशा स्थितीत त्याच्या विजयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, आता मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड नाझिला सिताशीने शोच्या विजेत्याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉसच्या विजेत्याच्या प्रश्नावर नाझिला काय म्हणाली?
मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड नाझिला काल रात्री मुंबईत तिच्या मैत्रिणींसोबत स्पॉट झाली. जिथे तिला पाहताच पापाराझींचा जमाव फोटो क्लिक करण्यासाठी धावला. अशा स्थितीत पापाराझींनी नाझीला मुनव्वरबद्दल प्रश्न विचारला. पापाराझीने नाझिलाला विचारले, ‘ती बिग बॉस 17 मध्ये मुनावर फारुकीला सपोर्ट करत आहे का? तिला त्याला बिग बॉस 17 चा विजेता बघायचा आहे का? या प्रश्नांना नाझिलाने कोणतेही उत्तर दिले नाही. प्रश्न ऐकून ती हसत दिसली.
नझिलाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर युजर्सकडून मजेदार कमेंट येत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘ती फुकटात प्रसिद्ध झाली.’ त्याचवेळी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘तिला मुनव्वरला विजेता बनताना पाहायचे आहे.’ मुनव्वर विजेता होताच ती पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल, असे अनेकांनी तर्क लावले आहेत.
बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच मुनव्वरने स्वतःबद्दल आणि नाझिलाबद्दल अनेक किस्से सांगितले होते. मात्र आयशा खानच्या एंट्रीने त्याचे अनेक खोटे उघड झाले. यानंतर नझिलाने व्हिडिओ शेअर करून सर्व काही स्पष्ट केल्या. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.