Akshay Kumar Film : फ्लॉप जाऊनही अक्षय कुमारकडे चित्रपटांची नाही कमी, येतायेत हे १० सिनेमे

Ahmednagarlive24 office
Published:
Akshay Kumar Film

Akshay Kumar Film : अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो नेहमीच व्यस्त असतो. तो जितके सिनेमे एका वर्षात करतो तितके सिनेमे शकतो कुणी करत नाही असे म्हटले जाते. त्याचे दरवर्षी किमान चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतातच.

मागील काही वर्षांत त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर काही खास चालले नाहीत. बहुतेक सिनेमे फ्लॉप ठरले आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अक्षयचे पुढील दोन वर्षांत आणखी दहा सिनेमे येणार आहेत. विविध रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारचे हे दहा सिनेमे बनवण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. जे येत्या दोन वर्षांत एकापाठोपाठ एका थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे आहेत चित्रपट

अक्षय पुढील दोन वर्षात ज्या 10 चित्रपटांमध्ये दिसणार आहे त्याची यादी – हेरा फेरी 3, हाऊसफुल 5, वेलकम 3, सिंघम अगेन, वेडात मराठे वीर दौडले सात (मराठी), बडे मियाँ छोटे मियाँ, स्टार्टअप, सोरारई पोटरू, स्काय फोर्स आणि शंकरा.

या वर्षातील शेवटचा चित्रपट मिशन राणीगंज उद्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अक्षयवर त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याची टीका होत आहे कारण तो एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करतो, त्यामुळे तो चित्रपटांमध्ये त्याचे 100 टक्के योगदान देऊ शकत नाही असा आरोप केला जात आहे. मात्र अक्षय हे गोष्ट साफपने नाकारतो.

नवीन सिनेमाची परीक्षा

अक्षय बॉक्स ऑफिसवर मोठा स्टार आहे आणि त्याचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे. मात्र, उद्या प्रदर्शित होणारा त्याचा मिशन राणीगंज हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धोक्यात असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा देखील आहे.

चित्रपटाची पाहिजे तशी चर्चा होत नाहीये . हा चित्रपट अक्षयच्या प्रतिष्ठेप्रमाणे कामगिरी करू शकेल का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिशन राणीगंजच्या आगाऊ बुकिंगच्या अहवालामुळे आशा निर्माण होत नाहीये.

हा चित्रपट अक्षय कुमारचा बॉक्स ऑफिसवर सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरू शकतो, अशी भीतीही अनेकांना वाटत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe