अभिनेत्री अंबर हर्डने मदर्स डे निमित्त तिच्या चाहत्यांसह एक मोठी आनंदाची बातमी दिली. आपण जुळ्या मुलांना जन्म दिल्याचे तिने चाहत्यांना सांगितले. तिला एक मुलगा व एक मुलगी झाली. मुलीचे नाव एग्नेस आणि मुलाचे नाव ओशन ठेवल्याचेही तिने सांगितले. आता याच बातमीचा प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्कशी संबंध जोडण्यात आला. अंबर हर्डची मुले ही एलोन मस्कची असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
काय म्हणाली अंबर हर्ड?
हर्डने तिच्या मुलांच्या पायांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिने लिहिले की, ‘2025 चा मातृदिन मी कधीही विसरणार नाही. या वर्षी मी वर्षानुवर्षे ज्या कुटुंबाची उभारणी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे त्याच्या पूर्णत्वाचा आनंद साजरा होतोय. आज मी अधिकृतपणे बातमी शेअर करत आहे की मी हर्ड गँगमध्ये जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. माझी मुलगी एग्नेस आणि माझा मुलगा ओशन माझे हात आणि माझे हृदय भरलेले ठेवतात. चार वर्षांपूर्वी जेव्हा माझे पहिले मूल, ऊनाघ, जन्माला आले, तेव्हा माझे जग कायमचे बदलले. मला वाटले की मी यापेक्षा आनंदी असू शकत नाही.

एलोन मस्कशी संबंध
अंबर हर्डच्या घोषणेनंतर या मुलांचे वडील एलोन मस्क असू शकतात, असा दावा करण्यात आला. एलोन मस्क आणि अंबर हर्ड 2016 ते 2018 दरम्यान डेट करत होते. या काळात त्यांनी गोठवलेल्या गर्भांबाबत कायदेशीर लढाई लढली. काही लोकांचा असा विश्वास आहे की जुळे ते गोठलेले गर्भ असू शकतात. एलोन मस्कला यापूर्वी 14 मुले आहेत, असा दावा करण्यात आला होता. म्हणजेच आता अंबरला झालेली मुले ही एलोन मस्क यांची 15 व्या व 16 व्या क्रमांकाची मुले आहेत, असाही दावा केला जात आहे.