Panchayat Web Series : अलीकडे टीव्हीवरील मालिका बघण्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज पाहण्यास अधिक पसंती मिळत आहे. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन वेब सिरीज रिलीज होत आहे. दरम्यान पंचायत वेब सिरीजच्या चाहत्या वर्गासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पंचायत 1, पंचायत 2 च्या अभूतपूर्व यशानंतर आता लवकरच पंचायत 3 वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पंचायतचा पहिला पार्ट रिलीज झाल्यानंतर याला प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दाखवला. या वेब सिरीजने एक मोठा चाहता वर्ग बनवला. पंचायत वेब सिरीज एवढी फेमस झाली की अवघ्या काही महिन्याच्या काळात पंचायत 2 ही वेब सीरीज रिलीज झाली. त्यानंतर आता पंचायत तीन ही वेब सिरीज देखील रिलीज साठी जवळपास तयार झाली आहे. लवकरच ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपणार आहे. वास्तविक, अलीकडेच पंचायत सीझन 3 चा फर्स्ट लूक अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने रिलीज केला आहे. यामध्ये सचिव पाठीवर बॅग घेऊन दुचाकीवर कुठेतरी जाताना दाखवले जात आहे. मात्र या चित्रावरून तो फुलेरा गाव सोडतोय की नाही हे स्पष्ट होत नाही. हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
जेव्हा ही Web Series अमेझॉन प्राईम वर रिलीज होईल तेव्हाच याबाबत समजू शकणार आहे. दरम्यान, ही Panchayat Web Series केव्हा रिलीज होणार ? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात असतांनाच पंचायत वेबसिरीजशी संबंधित कलाकार मंजू देवीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने शोचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर कलाकार आणि क्रू मेंबर्ससोबत केक कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे पंचायत 3 लवकरच रिलीज होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मात्र याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. म्हणून ही वेब सिरीज केव्हा रिलीज होणार हाच मोठा प्रश्न आहे. ही वेब सिरीज या महिन्याच्या अखेरपर्यंत रिलीज होते की नवीन वर्षातच रिलीज होते हे आता पाहण्यासारखे ठरणार आहे. या वेब सीरिजचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे म्हणून आता Panchayat Web Series लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर दिसणार असे बोलले जात आहे.