शाहरुख खान हा उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याला कसलाही आधार नसताना केवळ अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर त्याने राज्य केलं. अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिले आहेत. त्याला आज बॉलिवूडचा किंग असे संबोधले जाते.
शाहरुखने १९९१ साली गौरीबरोबर लग्न केलं होत. हा विवाह आंतरधर्मीय असल्याने त्यावर अनेकदा चर्चा देखील झाल्या. विशेष म्हणजे या लग्नास गौरीच्या कुटुंबीयांचा देखील विरोध होता.

पण किंग खान ने गौरीच्या आईवडिलांचीही मनं जिंकत लग्नासाठी होकार मिळवला. हिंदू पद्धतीनेच त्यांचं लग्न झालं होतं. त्याबाबतचा व त्यानंतरचा किस्सा शाहरुख खानने सांगितला होता.
शाहरुखने त्याच्या सासरच्या मंडळींबरोबर प्रँक केला होता. शाहरुख मुस्लीम असल्याने गौरीचे नातेवाईक अनेक गोष्टी सांगत असत. लग्नानंतर शाहरुख खान गौरीचं नाव बदलणार आहे. गौरीचे नातेवाईक म्हणत होते की, ते तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडतील.
या सर्वांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय शाहरुखने घेतला होता. लग्नानंतर रिसेप्शन देण्यात आलं. त्यावेळी वेळी शाहरुख सगळ्यांसमोरच गौरीला म्हणाला, “चल गौरी उठ. गौरी बुरखा घाल आणि नमाज पठण कर. तुझं नाव बदलून आयशा करू. तू नमाज पठण करशील आणि घरातून बाहेर पडणार नाहीस.
” शाहरुख असं म्हणाल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. कुजबुज सुरु झाली. चर्चांना उधाण आलं. परंतु लगेचच त्याने हा प्रँक असल्याचं जाहीर केलं.