पावसाळ्यात भारतातील ‘या’ रेल्वे मार्गांवरून कराल प्रवास तर मिळेल निसर्ग सफारीचा अत्युच्च आनंद; पृथ्वीवर अनुभवाल स्वर्ग

Monsoon Trip:- पावसाळ्याचा कालावधीमध्ये निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू, आकाशाला वाकुल्या दाखवत हळूच उगवणारे हिरवेगार गवत, रिमझिम पडणारा पाऊस, दुथडी भरून वाहणारी नदी नाले आणि या निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत प्रवास करणे म्हणजेच पृथ्वीवर स्वर्ग अनुभवण्यासारखा फील आपल्याला या कालावधी येतो. या कालावधीमध्ये आपण पर्यटन स्थळांना भेट देतो व त्या ठिकाणी फिरून आपण निसर्गाचे सौंदर्य पाहत असतो. परंतु या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा या कालावधीत एखाद्या घाट रस्त्यावरून प्रवास करत असतात तेव्हा देखील आपल्याला निसर्गाचा अद्भुत आनंद घेता येतो.

तसेच आपण बऱ्याचदा रेल्वेने देखील प्रवास करतो व अशी अनेक रेल्वे मार्ग आहेत की त्या निसर्गाच्या सानिध्यातून जातात व अशावेळी रेल्वेतून प्रवास करत असताना अशा निसर्ग सौंदर्यामुळे देखील आपला प्रवास खूप आनंददायी ठरतो. अगदी याच पद्धतीने जर आपण भारतातील काही रेल्वे मार्ग पाहिले तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जाऊन एकदा तरी प्रवास करणे गरजेचे आहे. कारण प्रवास करत असताना जर तुम्हाला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा निसर्गाचे सौंदर्य पहायचे असेल तर रेल्वे मार्ग खूप बेस्ट पर्याय आहेत.

पावसाळ्यात करा या रेल्वे मार्गाने प्रवास आणि निसर्गाच्या सौंदर्याचा घ्या आनंद

1) कोकण रेल्वे – कोकण रेल्वे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात सुंदर व निसर्गाने समृद्ध असा रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. हा रेल्वे मार्ग साधारणपणे महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांमधून असून त्याचे अंतर 738 किलोमीटर आहे. हा रेल्वे मार्ग भारताची पश्चिम किनारपट्टीला असलेल्या विविध गाव व शहरांशी कनेक्ट करण्याचे काम करतो. निसर्गाने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातून कोकण रेल्वे मार्ग जातो. रेल्वे मार्गावर असंख्य बोगदे असून अनेक धबधबे तसेच नद्या आणि पूल देखील तुम्हाला पाहायला मिळतात. पावसाळ्यामध्ये जर या मार्गाने प्रवास केला तर या तिघांचे दृश्य मनाला भुरळ घालते.

2) कालका-शिमला रेल्वेमार्ग – देशातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रेल्वे मार्गांपैकी कालका शिमला रेल्वेमार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वात सुंदर आणि आकर्षक रेल्वे मार्ग असून याला टॉय ट्रेन म्हणून ओळखले जातो. कालका ते शिमला हे 96 किलोमीटरचे अंतर असून हे अंतर पार करताना तुम्हाला अनेक सुंदर अशी दृश्य पाहायला मिळतात. या मार्गावरील बोगदा असून ट्रेन या बोगद्यातून प्रवास करते व पावसाळ्यामध्ये जेव्हा या मार्गावर ट्रेन धावत सुटते तेव्हा तुम्ही आजूबाजूचा निसर्ग सौंदर्याने नटलेला नजारा आणि नयनरम्य दृश्य पाहू शकतात. या रेल्वे मार्गाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात व बर्फवृष्टी कालावधीत खूप सुंदर असे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात.

3) बेंगलोर-गोवा रेल्वेमार्ग – पावसाळ्यामध्ये बेंगलोर ते गोवा रेल्वे मार्गाने प्रवास करणे खूप फायद्याचे ठरते. हा पाचशे किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग असून मार्गावर प्रवास करताना ट्रेन उंचच उंच डोंगररांगा तसेच गवताळ प्रदेश, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि उंच पुलावरून प्रवास करते तेव्हा तुम्हाला निसर्ग काय असतो किंवा निसर्गाच्या सौंदर्य काय असते हे पाहता येते व त्याचा जवळून अनुभव घेता येतो. पावसाळ्यामध्ये या रेल्वे मार्गाचे सौंदर्य आणखीनच खुलते.

4) मंडपम-रामेश्वरम रेल्वेमार्ग – हा रेल्वे मार्ग देखील एक जगातील सर्वात सुंदर रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. या रेल्वे मार्गामुळे रामेश्वरम हे तामिळनाडू राज्यातील मंडपम या शहराशी जोडले गेलेले आहे. या रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील दुसऱ्या नंबरच्या सर्वात लांब पूल म्हणजेच पंबन ब्रिज वरून जातो व या ब्रिज ची लांबी 2.2 किलोमीटर आहे. जेव्हा तुम्ही या रेल्वे मार्गाने प्रवास करतात तेव्हा तुम्हाला समुद्राचे निळेशार पाणी दूरवर पाहता येते. तसेच अद्भुत असे अनेक रोमँटिक करणारे निसर्ग सौंदर्याची ठिकाणे देखील तुम्हाला बघायला मिळतात.

5) जलपाईगुडी-दार्जिलिंग रेल्वेमार्ग – डोंगरामधून धावणाऱ्या ट्रेनने जर प्रवास करायचा असेल तर सगळ्यात जास्त पसंती ही दार्जिलिंग रेल्वे लाईनला दिली जाते. हा रेल्वेमार्ग त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जेव्हा तुम्ही दार्जिलिंग आणि जलपाईगुडी दरम्यान धावणारी जी काही ट्रेन आहे त्याच्याने प्रवास करतात तेव्हा तुमचे डोळे दिपवणारे अनेक नैसर्गिक दृश्य तुम्हाला दिसतात. पावसाळ्यामध्ये जेव्हा डोंगरावरून ही ट्रेन जाते तेव्हा आपल्याला स्वतःचा विसर पडतो. या प्रवासामध्ये तुम्ही तलाव आणि धबधबे तसेच चहाच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या बागा पाहू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe