Indian Crime Thriller Movies : हे आहेत बॉलिवूडमधील 10 क्राईम थ्रिलर चित्रपट! पाहून येईल अंगावर काटा; पहा यादी

Published on -

Indian Crime Thriller Movies : तुम्हालाही बॉलिवूडमधील क्राईम थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आज तुम्हाला भारतातील १० अशा क्राईम थ्रिलर बॉलिवूड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

भारतात आजपर्यंत असे अनेक बॉलिवूडमध्ये क्राईम थ्रिलर चित्रपट बनले आहे ज्यांनी सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड देखील केला आहे. भारतात आजही क्राईम थ्रिलर चित्रपटांना मोठी पसंती मिळताना दिसते.

भारतीय क्राइम थ्रिलर चित्रपट

1. अंधाधुन

श्रीराम राघवन यांनी अंधाधुन हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा एक डार्क कॉमेडी-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तब्बू, आयुष्मान खुराना, राधिका आपटे, अनिल धवन यांनी काम केले आहे.

2. दृश्यम्

दृश्यम् हा चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर त्याने देखील चांगली कमाई केली होती. या चित्रपटाचा देखील क्राइम थ्रिलरमध्ये समावेश आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता या कलाकारांनी काम केले आहे.

3. कहानी

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात समाविष्ट असलेला हा चित्रपट देखील एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. सुजॉय घोष यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. परमब्रत चॅटर्जी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

4. तलाश

तलाश हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान, करीना कपूर, राणी मुखर्जी, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव हे कलाकार आहेत.

5. अ वेन्सडे

अ वेन्सडे चित्रपट देखील एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवून दहशत माजवण्याची धमकी दिल्याची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर, जिमी शेरगिल, दीपल शॉ या कलाकारांनी काम केले आहे.

6. रंग दे बसंती

या सुपरहिट चित्रपटात आमिर खान, सिद्धार्थ नारायण, सोहा अली खान, कुणाल कपूर, माधवन, शर्मन जोशी, अतुल कुलकर्णी असे कलाकार आहेत. हा चित्रपट देखील क्राइम थ्रिलरवर आधारित आहे.

7. स्पेशल 26

स्पेशल 26 हा चित्रपट देखील क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. नीरज पांडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज बाजपेयी, जिमी शेरगिल, काजल अग्रवाल, राजेश शर्मा, दिव्या दत्ता यांसारख्या कलाकारांनी काम केले आहे.

8. काबिल

हृतिक रोशन, यामी गौतम, रोनित रॉय, रोहित रॉय यांसारख्या कलाकारांनी भूमिका असलेला हा सर्वोत्तम क्राईम थ्रिलर आहे. यामध्ये एका अंध व्यक्तीची कथा आहे ज्याच्या पत्नीवर बलात्कार होतो आणि ती आत्महत्या करते. याचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे.

9. बदलापूर

बदलापूर हा चित्रपट रिव्हेंज थ्रिलर आहे. या चित्रपटामध्ये राधिका आपटे, वरुण धवन, नवाजुद्दीन सिद्दीकी या कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे.

10. आर्टिकल 15

आर्टिकल 15 हा चित्रपट देखील थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान, नस्सर, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्युब, सुशील पांडे या कलाकारांनी काम केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe