Interesting Gk question : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहे ज्याची उत्तरे तुम्ही जाणून घ्या.
प्रश्नमंजुषा आणि कोडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असे प्रश्न सरकारी नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षांमध्ये विचारले जातात. हे प्रश्न तुमच्या ज्ञानात खूप भर घालतात.
प्रश्न- कोणत्या देशाने सुझोऊ येथे दक्षिण कोरियाचा 3-0 असा पराभव करून विक्रमी 13व्या सुदिरमन कप बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले?
उत्तर – ‘चीन’ या देशाने सुझोऊ येथे दक्षिण कोरियाचा 3-0 असा पराभव करून विक्रमी 13व्या सुदिरमन कप बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले आहे.
प्रश्न- BCCI ने IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये प्रत्येक डॉट बॉलवर किती झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर – 500 झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न- जपानमधील गोल्डन ग्रां प्री 2023 ऍथलेटिक्स मीटमध्ये महिलांच्या लांब उडी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने कांस्यपदक जिंकले?
उत्तर – शेली सिंग
प्रश्न- अलीकडेच भारतीय बास्केटबॉल महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर- डॉ. के. गोविंदराज
प्रश्न- इटालियन ओपनमध्ये होल्गर रुणला हरवून पहिले क्ले कोर्ट विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर- डॅनिल मेदवेदेव
प्रश्न-. झारखंडमध्ये देशातील सर्वात मोठ्या उच्च न्यायालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तर – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वात मोठ्या उच्च न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
प्रश्न- ‘हमर सुघर लिका अभियान’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले?
उत्तर – छत्तीसगड
प्रश्न- उत्तराखंडची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या दोन शहरांमधून धावेल?
उत्तर: डेहराडून आणि दिल्ली
प्रश्न- बीसीसीआयने टीम इंडियासाठी नवीन किट प्रायोजक म्हणून कोणाची निवड केली आहे?
उत्तर- एडिडास
प्रश्न : मी हिरवा आहे पण पान नाही, मी नकला करतो पण माकड नाही, सांगा तो हिरवा निसर्ग कोण आहे?
उत्तर – पोपट