Interesting Gk question : सरकारी नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षांमध्ये विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न आज आम्ही घेऊन आलो आहे. हे प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे असून ज्यांची उत्तरे प्रत्येकाला माहित असणे गरजेचे आहे.
चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न. नुकताच 09 जून रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला आहे?
उत्तर: जागतिक मान्यता दिन
प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे ‘शक्ती स्मार्ट कार्ड योजना’ सुरू केली आहे?
उत्तर : कर्नाटक
प्रश्न. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने मिळून पहिला ‘सागरी भागीदारी सराव’ सुरू केला आहे?
उत्तरः फ्रान्स आणि यूएई
प्रश्न. नुकतीच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा’ या विषयावरील पहिली जागतिक परिषद कोणता देश आयोजित करणार आहे?
उत्तर: ब्रिटन
प्रश्न. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्नमेंट 2023 इन फिगर्स’ अहवालात पर्यावरण क्षेत्रात कोणत्या राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे?
उत्तर : तेलंगणा
प्रश्न. नुकतेच भारत आणि ‘सर्बिया’ देशाने द्विपक्षीय व्यापार किती युरोपमध्ये ठरवला आहे?
उत्तर: 01 अब्ज युरो
प्रश्न. ‘आशियाई अंडर-20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023’ मध्ये भारताने अलीकडे किती पदके जिंकली आहेत?
उत्तर: 19 पदके
प्रश्न. भारत आणि न्यूझीलंड देशांमधली पहिली ‘संयुक्त गोलमेज बैठक’ नुकतीच कुठे होणार आहे?
उत्तर : नवी दिल्ली
प्रश्न. नुकताच पहिला ‘जिल्हा सुशासन निर्देशांक’ कोणत्या राज्यात प्रसिद्ध झाला आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
प्रश्न. नुकतीच ‘मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा’ कुठे होणार आहे?
उत्तर : भारत
प्रश्न : अमेरिका पहिल्या क्रमांकावर असताना कोणता देश दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे?
उत्तर : चीन