मित्रानो कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय शोचं नवं पर्व लवकरच सुरू होत आहे, आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा होस्टच्या खुर्चीवर दिसणार आहेत. या शोचं १७ वं सत्र (KBC 17) प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. शो कधी सुरू होईल, याबाबतची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण नोंदणीची तारीख समोर आली आहे.
याबद्दल सोनी टीव्हीने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे की, KBC 17 साठी नोंदणी प्रक्रिया १४ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. जर तुम्हाला या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. नोंदणी कशी करायची आणि त्यासाठी काय करावं लागेल, हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयुक्त ठरेल.

सोनी टीव्हीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे, “१४ एप्रिलपासून हॉट सीटवर येण्यासाठी सज्ज व्हा. केबीसी नोंदणी आणि आमचे एबी (अमिताभ बच्चन) प्रश्न सुरू होणार आहेत.” याचा अर्थ असा की, १४ एप्रिल २०२५ पासून नोंदणी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होईल. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी लागतील.
नोंदणी कशी कराल?
SonyLiv ॲपद्वारे:
सर्वप्रथम Google Play Store किंवा Apple App Store वरून SonyLiv ॲप डाउनलोड करा.
ॲप उघडल्यानंतर KBC नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
१४ एप्रिलपासून दररोज रात्री ९ वाजता अमिताभ बच्चन एक प्रश्न विचारतील, त्याचं उत्तर A, B, C, D या पर्यायांमधून निवडा.
तुमची वैयक्तिक माहिती (नाव, वय, लिंग, संपर्क क्रमांक) भरा आणि सबमिट करा.
नोंदणी यशस्वी झाल्यावर तुम्हाला पुष्टीकरण मेसेज मिळेल.
SMS द्वारे:
तुमच्या मोबाइलवरून ५६६७७११ या क्रमांकावर मेसेज पाठवा.
मेसेजचं स्वरूप असं असेल: KBC <स्पेस> उत्तर (A/B/C/D) <स्पेस> वय <स्पेस> लिंग (M/F/O).
उदाहरण: जर उत्तर A असेल, तुमचं वय ३० असेल आणि तुम्ही पुरुष असाल, तर मेसेज असा असेल – “KBC A 30 M”.
प्रत्येक SMS साठी ३ रुपये आकारले जाऊ शकतात.
IVR कॉलद्वारे:
५०५२५२५ या क्रमांकावर कॉल करा.
IVR सूचनांचं पालन करून प्रश्नाचं उत्तर द्या (१-A, २-B, ३-C, ४-D).
तुमची माहिती नोंदवल्यानंतर कॉल संपेल आणि तुमची नोंदणी पूर्ण होईल.
अशी होईल निवड
नोंदणी प्रक्रियेनंतर, योग्य उत्तरे देणाऱ्या उमेदवारांमधून रँडमायझरद्वारे निवड केली जाईल. निवड झाल्यास तुम्हाला पुढील फेरीसाठी (ऑडिशन आणि मुलाखत) संपर्क केला जाईल. हा शो दरवर्षी लाखो लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी घेऊन येतो, आणि यंदाही अमिताभ बच्चन यांच्या खास शैलीत प्रेक्षकांचं मनोरंजन करेल.