२५ जानेवारी २०२५ महाकुंभनगर : बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने आता आध्यात्मिक जगात पाऊल टाकले असून,शुक्रवारी किन्नर आखाड्याअंतर्गत स्वतःचे पिंडदान करून संन्यास घेतला.
किन्नर आखाड्याकडून महाकुंभमेळ्यात दाखल झालेल्या ममताला महामंडलेश्वर उपाधी बहाल करण्यात आली.किन्नर आखाड्यात धार्मिक आणि भौतिक स्वातंत्र्याची मुभा असल्याने आपण त्याची निवड केल्याचे ममताने म्हटले.
५३ वर्षीय ममता कुलकर्णीने संगम तटावर आपल्या हाताने स्वतःचे पिंडदान केले.किन्नर आखाड्याची आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी ममताला दीक्षा दिली. ममताचे ‘यमाई ममता नंद गिरी’ असे नवे नावही देण्यात आले.