Salaar Movie Box Office Collection : ‘सालार’ बॉक्स ऑफिसवर हिट ! 7 दिवसांत केली तब्बल इतक्या कोटींची कमाई…

Ahmednagarlive24 office
Published:
Salaar Movie Box Office Collection

Salaar Movie Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर गेल्या 7 दिवसांपासून सालार चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार प्रभासने या चित्रपटामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. प्रभासच्या अनेक जबरदस्त चित्रपटांमुळे त्याची ओळख परदेशात देखील पोहोचली आहे.

प्रभासच्या अभिनयामुळे त्याच्या चित्रपटांना परदेशात देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभासच्या चित्रपटांमुळे वर्ल्ड वाइड कलेक्शन खूप मजबूत असल्याचे दिसत आहे. प्रभासने आदिपुरुष या चित्रपटामध्ये रामाच्या भूमिकेत काम केले आहे.

आदिपुरुष चित्रपटावर अनेकांनी टीका केली होती. मात्र त्यानंतर आता प्रभासच्या सालार चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सालार चित्रपटाला टक्कर देण्यासाठी अभिनेता शाहरुख खानचा डंकी चित्रपट देखील रिलीज झाला आहे. सालार आणि डंकी या चित्रपटला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र येत्या काळात कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करेल हे लवकरच स्पष्ट होईल.

सालार चित्रपटाने 7 दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?

सालार चित्रपट रिलीज होऊन 7 दिवस होऊन गेले आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 90.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सालार चित्रपटाने 55.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

प्रभासच्या सालार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी 64.07 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी 42.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 17.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तर 6व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 17.00 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. तर सातव्या दिवशी सालार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 13.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सात दिवसांत सालार चित्रपटाने तब्बल 308.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सालार चित्रपट कास्टिंग

सालार चित्रपटामध्ये दक्षिण भारतीय अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसत आहे. तसेच चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसत आहे. अभिनेत्री म्हणून मीनाक्षी चौधरी आणि श्रुती हसन यांनी काम केले आहे.

सालार दिग्दर्शक

दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सालार चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रशांत नील हे लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. ते अनके वेगवेगळे चित्रपट सतत रिलीज करत असतात. सालार चित्रपटामध्ये देखील त्यांची जबरदस्त दिग्दर्शन केले आहे.

सालार चित्रपटाचे बजेट

सालार चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांचे बजेट खर्च झाले आहे. मात्र चित्रपटाने आतापर्यंत बंपर कमाई केली आहे. लवकरच भारतात सालार चित्रपट ४०० कोटींचा टप्पा पार करेल. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe