Scam 2003 : काही दिवसांपूर्वी भारतात Scam 1992 हा OTT शो आला होता. यामध्ये शेअर मार्केटमध्ये झालेल्या गाठल्याची स्टोरी दाखवण्यात आली होती. हा शो भारतातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय OTT ठरला होता. आता या शो नंतर आणखी एका घोटाळ्याचा शो OTT प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार आहे.
Scam 1992 या OTT शोमध्ये प्रतिक गांधी यांनी हर्षद मेहताच्या भूमिकेत काम केले आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या घोटाळ्याची स्टोरी भारतामध्ये अधिक लोकप्रिय झाली. 2020 मध्ये हा शो प्रदर्शित झाला होता. या शोच्या टायटल ट्रॅक इतका व्हायरल झाला होता की, आजही तो अनेकांच्या रिंगटोनमध्ये पाहायला मिळत आहे.

Scam 1992 या OTT शोचे दिग्दर्शक हंसल मेहता होते. हंसल मेहता यांनी अगोदरच घोटाळ्याचे सीक्वल आणणार असल्याचे सांगितले आहे. हंसल मेहता यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘स्कॅम 2003’ या OTT शोचे नाव जाहीर केले होते. या शोचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. लवकरच प्रेक्षकांना हा शो पाहायला मिळणार आहे.
स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर आधारित कथा
‘स्कॅम 2003’ ही देशातील सर्वात मोठा स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज असणार आहे. देशात त्याकाळी इतका मोठा स्टॅम्प घोटाळा झाला होता की, त्याचा अंदाज लावणे देखील कठीण आहे.
वेब सिरीजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हा स्टॅम्प घोटाळा तब्बल 30 हजार कोटींचा होता. स्टॅम्प घोटाळ्याचा मुख्य आरोपी हा अब्दुल करीम तेलगी होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अब्दुल करीम तेलगीला 30 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या स्कॅम 1992 मधील म्युझिक थीमही स्कॅम 2003 यामध्ये वापरण्यात आली आहे. तसेच स्कॅम 2003 या वेब सिरीजमध्ये ‘लाइफ में आगे बढ़ना है तो डेयरिंग तो करना पड़ेगा न डार्लिंग.’ हा डायलॉग वापरण्यात आला आहे.
हा डायलॉग स्कॅम 1992 ‘इश्क है तो रिस्क है’ याची आठवण करून देत आहे. तसेच या नवीन वेब सिरीजमध्ये ‘मुझे पैसा कमाने का कोई शौक नहीं है, क्योंकि पैसा कमाया नहीं, बनाया जाता है.’ हा डायलॉग देखील वापरण्यात आल्याचे टीझरमध्ये दिसत आहे.
आगामी ‘स्कॅम 2003’ हा OTT शो तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘स्कॅम 2003’ ची कथा पत्रकार संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते गगन देव रियार हे अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारणार आहेत. ‘स्कॅम 2003’ हा OTT शो सोनी लिव्हवर 1 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.