‘हा’ आहे देशातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग! यावरून प्रवास करताना दिसतो बर्फाच्छादित पर्वत आणि मैदानी प्रदेशांचा नजारा आणि बरच काही….

Longest Expressway :- वाहतूक आणि दळवण्याच्या दृष्टिकोनातून सहजता, सुलभता यावी आणि त्यासोबतच देशातील महत्त्वाची शहरे एकमेकांशी कनेक्ट करता यावे याकरिता भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर महामार्गांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यासोबतच मोठमोठे असे रस्ते प्रकल्पाचे काम सुरू आहे व त्यातील उदाहरणच घ्यायचे झाले तर मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेचे आपल्याला घेता येईल. अगोदर जे राष्ट्रीय महामार्गांची उभारणी करण्यात आलेली आहे यातील काही महामार्ग हे देशातील खूप मोठा भाग व्यापतात व अनेक राज्यांमधून या महामार्गांचा प्रवास आपल्याला दिसून येतो.

महत्वाचे म्हणजे अशा महामार्गामुळे भारतातील अनेक शहरे कनेक्ट झाली आहेत व उद्योग व्यवसायांच्या दृष्टिकोनातून आणि जलद वाहतुकीच्या साठी या महामार्गांचे महत्व देखील अनन्यसाधारण आहे. यातील जर आपण देशातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्गाचा विचार केला तर तो श्रीनगर ते थेट दक्षिणेकडील कन्याकुमारीला जोडतो व हा साधारणपणे तीन हजार सातशे पंचेचाळीस किलोमीटर इतका लांबीचा आहे. त्यालाच आपण NH44 असे देखील म्हणतो. हा महामार्गावर प्रवास करताना अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात व अनेक राज्यांची वैशिष्ट्ये देखील अनुभवायला मिळतात.

काश्मीर ते कन्याकुमारी हा महामार्ग या कारणामुळे ठरतो वेगळा

1) सर्वात लांबीचा महामार्ग – श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत हा महामार्ग असून त्याची एकूण लांबी 3745 किलोमीटर इतकी असून तो देशातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. याच महामार्गाला NH44 असे नाव देण्यात आलेले आहे. हा महामार्ग देशातील तब्बल 11 राज्यातून जातो.

2) हा महामार्ग भारताच्या उत्तर ते दक्षिण टोकाला जोडतो – काश्मीर ते कन्याकुमारी हा महामार्ग देशातील 30 पेक्षा जास्त मोठ्या शहरांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. या महामार्गाचे एकत्रीकरण करण्यात आले असून आता यावरून प्रवास आणि दळणवळण खूप सोपे झालेले आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे भारताचे उत्तर ते दक्षिण टोकातील संपर्क देखील जलद व मजबूत होण्यास मदत झालेली आहे.

3) देशातील 11 राज्य जोडतो – या महामार्गाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा देशातील जवळपास 11 राज्यांमधून जातो. त्यातील राज्य म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांचा समावेश होतो.

4) तामिळनाडू राज्यात आहे सर्वाधिक अंतर – या अकरा राज्यांपैकी या महामार्गाचा सर्वात जास्त भाग तामिळनाडू राज्यातून जातो. साधारणपणे तामिळनाडूतून महामार्ग 627 किलोमीटरचे अंतर पार करतो. तसेच तेलंगणा आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये साधारणपणे पाचशे चार किलोमीटरचे अंतर कापतो तर जम्मूमध्ये याचे 304 किलोमीटरच्या अंतर आहे.

5) एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळून जातो – काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जाणारा हा महामार्ग दिवसाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेला असून लाईन ऑफ कंट्रोल अर्थात एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेच्या अगदी जवळून जाणारा महामार्ग आहे. या महामार्गाचे महाराष्ट्रातील लांबी 232 किलोमीटर आहे तर पंजाबमध्ये ती 278 किलोमीटर आहे.

6) यावरून प्रवास करताना तुम्हाला पाहता येतात बर्फाळलेले पर्वत आणि मैदानी प्रदेश – जेव्हा तुम्ही या महामार्ग वरून प्रवास करतात तेव्हा तुम्हाला अनेक निसर्गाने समृद्ध असलेली ठिकाणी पाहता येतात. या महामार्गावरून प्रवास करताना तुम्ही आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत, विस्तीर्ण मैदानी प्रदेश तसेच सागरी भाग देखील पाहू शकता. मध्यप्रदेश राज्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा कान्हा नॅशनल पार्क येथे वन्य प्राण्यांना रस्ता पार करता यावा यासाठी 750 मीटरचा लांब अंडरपास तयार करण्यात आलेला आहे व तुम्हाला प्रवासात कान्हा नॅशनल पार्क देखील पाहता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe