Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून दुहेरी हत्याकांडाची धकाकदायक बातमी आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील सुरेगाव येथे मुलानेच भावाचा व पित्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
सुरेगाव येथील स्वस्तात सोने देण्याच्या अनेक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या कुटुंबातील मुलानेच दारूच्या नशेत पित्यासह भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले असून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तालुक्यातील सुरेगाव येथील आदिवासी समाजातील घड्याळ हिरामण चव्हाण हे आपल्या कुटुंबासह राहत होते. दौंडसह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी घडलेल्या स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूट केल्या प्रकरणी अनेकदा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे समोर आली आहेत.
त्यातच त्याच्या घरातील वादामुळे घड्याळ याची सून नांदत नव्हती. त्यामुळे दिनांक 18 रोजी त्याचा मुलगा हा दारू पिऊन त्याची नांदत नसलेल्या पत्नीस आणण्यासाठी गेला. येथे घड्याळ हिरामण चव्हाण यांच्याकडे पत्नीला आणण्यासाठी पैशांची मागणी करू लागला.
मात्र पिता कोणतेही परिस्थितीत पैसे देत नसल्याने त्यांची बाचाबाची झाली. त्यांचे भांडण होत आहेत हे लक्षात आल्यावर आरोपीचा भाऊ महावीर घड्याळ चव्हाण मध्यस्ती करण्यासाठी गेला.
जावेद घड्याळ चव्हाण यांनी जवळील चाकू महावीर घड्याळ चव्हाण यांच्या पोटात खुपसला. हे पाहून मुलाला वाचवण्यासाठी पिता घड्याळ हिरामण चव्हाण हे गेले असता त्यांच्याही पोटात सुरा खुपसून खून केला.
खून केल्यावर त्याने घटनास्थळ सोडून पळ काढला, याबाबत गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती समजताच त्यांनी तांत्रिक माहिती मिळवून आरोपीला अवघ्या काही तासात जेरबंद केले. त्यास बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.