Ahmednagar Politics: अहमदनगरचे भाजपचे ताकतवर नेते आणि राज्य पातळीवरील वरिष्ठांमध्ये लाडके असलेले विशेषता देवेंद्र फडणवीस यांचे लाडके नेते विधान परिषद आमदार राम शिंदे यांचा काल अर्थातच एक जानेवारीला वाढदिवस होता.
वाढदिवसाच्या दिवशी आमदार राम शिंदे यांना विविध नेते मंडळीने शुभेच्छा दिल्यात. पण उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे राज्य पातळीवरील ताकतवर नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर राम शिंदे यांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छाच दिल्या नाहीत.
यामुळे नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे फडणवीस यांना राम शिंदेना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आठवण पडली की त्यांच्यात काही बिनसलं आहे ? हा मोठा प्रश्न सध्या अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे. आपल्या लाडक्या आमदाराला फडणवीसांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या नसल्याने सध्या राजकीय वर्तुळात फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांच्या काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
खरे तर विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे 2019 विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदार संघात रिंगणात उभे होते. त्यावेळी रामभाऊचा पराभव रोहित पवारांनी केला. यामुळे राम शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दवर याचा मोठा परिणाम होणार असे बोलले जात होते.
मात्र राम शिंदे हे फडणवीसांचे खूपच निकटवर्तीय आहेत. यामुळे त्यांना फडणवीसांच्या निकट असल्याचा फायदा मिळाला. फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे राम शिंदे यांना विधान परिषदेवरून निवडून आणले. फक्त फडणवीस यांच्या कृपादृष्टीमुळेच आमदार शिंदे विधान परिषदेचे आमदार झालेत, असे देखील सांगितले जाते.
मात्र काल राम शिंदे यांचा वाढदिवसाच्या दिवशी अनेक नेते मंडळींनी शिंदेला शुभेच्छा दिल्यात, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर पेजवर शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. कदाचित फडणवीस यांनी त्यांना प्रत्यक्ष फोन करून शुभेच्छा दिल्या असतील.
मात्र सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असणारे फडणवीस यांनी सोशल मीडियावर राम शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याने या दोघांमध्ये काहीतरी झालंय अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.
खरे तर उपमुख्यमंत्री महोदय यांनी ज्योतिराज्य सिंधिया-शिंदे, नामदेव ससाणे, मंत्री अब्दुल सत्तार, एन बिरेनसिंहजी, अशोक जी उईके, समीर कुणावर या नेत्यांना सोशल मीडिया पेज वरून शुभेच्छा दिल्यात. मात्र आपल्या जवळच्या आमदारालाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. यामुळे या दोघांमध्ये आता दुरावा निर्माण झाला की काय, अशा चर्चेला उधान येणे हे सहाजिकच आहे.
विखे पाटलांना आव्हान देणं राम शिंदेंना पडलं महागात
वास्तविक, राम शिंदे यांना लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यांनी स्वतःचं लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा बोलून दाखवली आहे. पक्षातूनही त्यांच्या नावाच्या चर्चा दबक्या आवाजात का होईना पण होत आहेत. विशेष म्हणजे शिंदे यांनी विखे पाटील यांचे कट्टर विरोधक असलेल्या आमदार लंके यांच्यासोबत एकाच वाहनातून प्रवास देखील केला आहे. एकंदरीत त्यांनी विखे पाटील यांना थेट आव्हान दिले आहे.
यामुळे भाजपामधील पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या दरम्यान एका कार्यक्रमाच्या वेळी कोल्हे यांच्या सोबतही आमदार राम शिंदे पाहिले गेले होते. यामुळे शिंदे यांच्यावर भाजपामधील राज्यस्तरावरील ज्येष्ठ नेते मंडळी थोडीशी नाराज असल्याचे बोलले जात आहे.
खरे तर नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा भाजपाला काबीज करायची आहे. यासाठी विखे पाटील हे संभाव्य उमेदवार राहणार आहेत. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना विखे यांच्या विरोधात कोणतेही पाऊल पडेल अशी भूमिका घ्यायची नाहीये. हेच कारण आहे की त्यांनी आमदार राम शिंदे यांच्याशी दुरावा साधला असावा आणि याच कारणाने त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी शिंदेंना शुभेच्छा दिल्या नसाव्यात अशा चर्चा रंगत आहेत.
दरम्यान फडणवीस यांनी सोशल मीडियावर आमदार राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या नाहीत कदाचित प्रत्यक्ष फोन करून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या असाव्यात. मात्र याबाबत अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.