बांगलादेशी घुसखोर महिलाही ‘लाडकी बहीण’

Published on -

२४ जानेवारी २०२५ मुंबई : पाच बांगलादेशी घुसखोर पकडल्यानंतर त्यांच्यातील एका महिलेने चक्क ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. या प्रकारामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सुरुवातीपासून चर्चेत आहे. विधानसभा निकालांनंतर या योजनेबाबत अनेक चर्चा रंगल्या. आता अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज करून योजना बंद करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात असतानाच, बांगलादेशी महिलांनीही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले.

किती बांगलादेशी महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली, यासंदर्भात मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तपास सुरू आहे. एकीकडे बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून, केंद्रीय स्तरावरूनही नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.त्यामुळे पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून कामाठीपुरा परिसरात ५ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

मुंबईत बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे येथील अटकेच्या घटनेतून उघडकीस आले आहे. सध्या मुंबईत बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई सुरू असून, या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबईत ५ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरीच पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. नीलम गोन्हेंकडून खंत समाजकंटक घुसखोरी करत आहेत, इथे आल्यावर आधारकार्ड काढतात.

ही लोकांची अपप्रवृत्ती आहे, जी चुकीची आहे, असे म्हणत बांगलादेशी घुसखोरांमध्ये लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेल्या महिलांसंदर्भात प्रतिक्रिया देताना विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी म्हटले आहे. भिवंडीत बांगलादेशींचा जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की, भिवंडी तालुक्यात हजारो बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले आहेत.

त्यांच्या मते, महाराष्ट्रात तब्बल दोन लाख रोहिंग्यांनी असे अर्ज सादर केले असून, काही दाखल्यांची चौकशी पूर्ण झाली आहे, तर अनेकांची तपासणी अद्याप बाकी आहे. महापोली, पडघा, बोरिवली आणि खोणी या गावांतील काही ग्रामपंचायतींवर बेकायदेशीर पद्धतीने जन्म प्रमाणपत्रे देण्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर पुढील दोन दिवसांत कारवाई केली जाईल, असे सोमय्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!