Edible Oil Price :-मागील काही महिन्यांच्या कालावधीमध्ये खाद्यतेलाने सर्वात उच्चांकी दर गाठल्याचे आपण बघितले. 175 ते 180 रुपये प्रतिकिलो सोयाबीन तेल त्या कालावधीमध्ये मिळत होते. त्यामुळे या खाद्यतेलातील दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले होते.
परंतु त्यानंतर मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून खाद्यतेलाचे दर कमी करण्याकरिता काही उपाययोजना करण्यात आल्या व त्याचा परिणाम म्हणून हळूहळू खाद्य तेलाच्या दरामध्ये घसरण होऊन किमती कमी झाल्या. त्याच अनुषंगाने या महागाईच्या भस्मासुराच्या कालावधीमध्ये आता खाद्यतेलाच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक बातमी सध्या समोर आली आहे. ती आपण या लेखात बघणार आहोत.
खाद्यतेल झाले स्वस्त
केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता खाद्यतेलाच्या किमतींमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत असून गेल्या वर्षभराचा विचार केला तर रिफाईंड सोयाबीन तेल आणि आरबीडी पामोलीनच्या किमती बऱ्याच प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
यासंबंधी विचार केला तर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिलेल्या माहितीनुसार रिफाइंड सूर्यफूल तेल 29 टक्के तर रिफाइंड सोयाबीन तेल एकोणीस टक्क्यांनी आणि पामोलीन तेल 25 टक्क्यांनी स्वस्त झालेले आहे. तसेच केंद्र सरकारचे आता देशांतर्गत किमतींवर देखील खूप काळजीपूर्वक लक्ष देत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
तसेच किरकोळ किमतींवरील बचतीचे जे काही फायदे आहेत ते ग्राहकापर्यंत पोहोचावे त्याकरिता केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर किमतींमध्ये जी काही कपात झाली आहे तितकीच कपात देशांतर्गत किमतीत निश्चित करण्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून या क्षेत्रातील उद्योग नेते आणि संबंधित संस्थांची चर्चा करत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने देशांतर्गत बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी करण्याकरिता आयातशुल्क कमी केले आहे. त्याचा सहा सकारात्मक फायदा दिसून आल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सध्या रिफाईंड पामोलीन तेलाच्या किमती 25.43 टक्क्यांनी तर रिफाइंड सोयाबीन तेलाच्या किमती 18.98 टक्क्यांनी कमी झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती देखील राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेमध्ये दिली.