Post Office Scheme : महिन्याला 12000 रुपयांची गुंतवणूक करून व्हा कोटींचे मालक; जाणून घ्या कसे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : तुम्ही सध्या गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय सापडत नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. पोस्ट ऑफिसची ही योजना दीर्घकाळात मोठा निधी तयार करण्यात खूप मदत करते.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. बाजारातील चढ-उताराचा त्याचावर कोणताही परिणाम होत नाही. येथील व्याजदर सरकारद्वारे ठरवले जातात. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेवर वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळत आहे.

तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते उघडू शकता. हे खाते फक्त 500 रुपयांमध्ये उघडता येते. यामध्ये वर्षाला 1.50 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येईल. या खात्याची परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे. परंतु परिपक्वतानंतर तुम्ही ते 5-5 वर्षे आणखी वाढवू शकता.

तुम्ही पीपीएफ खात्यात दर महिन्याला 12,500 रुपये जमा केल्यास आणि ते 15 वर्षे कायम ठेवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल, तर 18.18 लाख रुपये तुमचे व्याज उत्पन्न असेल. ही गणना पुढील 15 वर्षांसाठी वार्षिक 7.1 टक्के व्याजदर गृहीत धरून करण्यात आली आहे. व्याजदर बदलल्यास मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम बदलू शकते.

जर तुम्हाला या योजनेतून करोडपती व्हायचे असेल, तर तुम्हाला 15 वर्षांनंतर 5-5 वर्षांसाठी दोनदा मुदतवाढ द्यावी लागेल. म्हणजेच आता तुमचा गुंतवणुकीचा कालावधी 25  वर्षांचा असेल. अशा प्रकारे 25 वर्षांनंतर तुमचे एकूण पैसे 1.03 कोटी रुपये होतील. या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये असेल, तर तुम्हाला व्याज उत्पन्न म्हणून 65.58 लाख रुपये मिळतील. लक्षात घ्या जर तुम्हाला पीपीएफ खाते वाढवायचे असेल तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी अर्ज करावा लागेल.

पीपीएफ योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते आयकर कलम 80 सी अंतर्गत कर लाभ देते. यामध्ये योजनेतील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेतली जाऊ शकते. पीपीएफ व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त आहे.