तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सोमवारी वेदांता लिमिटेडसोबतचे जॉईंट व्हेंचर तोडले आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी गेल्या वर्षी हा करार केला होता. या तैवानच्या कंपनीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी $19.5 अब्ज गुंतवणुकीचा करार केला होता.
वेदांत आणि फॉक्सकॉन कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी गेल्या वर्षी हा करार केला होता. पण आता हा करार संपुष्टात आला आहे, वेदांतची भारतात सेमीकंडक्टर उभारण्याची योजना धोक्यात आली असून या निर्णयानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया युजर्स व्यक्त करत आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या निदर्शनास ही बातमी आली आहे. फॉक्सकॉनने निवेदन जारी करून म्हटले आहे की, वेदांतची पूर्ण मालकीची उपकंपनी फॉक्सकॉन आपले नाव काढून टाकण्याचे काम करत आहे. फॉक्सकॉनने सांगितले की, कंपनीने वेदांतासोबत संयुक्त उपक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुळात हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता मात्र मध्यंतरीच्या काळात हा प्रकल्प गुजरातला गेला होता, गेल्या वर्षी, अनिल अग्रवाल यांच्या वेदांतने फॉक्सकॉनच्या सहकार्याने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी वेदांत समूहाला गुजरात सरकारकडून आर्थिक आणि सबसिडी देखील मिळाली, भांडवली खर्चाव्यतिरिक्त स्वस्त वीज उपलब्ध करून देण्याची परवानगीही देण्यात आली.
मात्र आज देशातच चिप्स (सेमीकंडक्टर) बनवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. तैवानी कंपनी फॉक्सकॉनने सोमवारी सांगितले की त्यांनी भारतीय दिग्गज वेदांता लिमिटेड सोबतच्या $19.5 अब्ज सेमीकंडक्टर जॉइंट व्हेंचरमधून (JV) माघार घेतली आहे. वेदांताचा शेअर सोमवारी बीएसईवर २८२.२५ रुपयांवर बंद झाला.
फॉक्सकॉनने म्हटले आहे की, “सेमीकंडक्टर कल्पनेला वास्तवात रुपांतरित करण्यासाठी त्यांनी वेदांतसोबत वर्षभर काम केले आहे. तथापि, त्यांनी परस्पर संयुक्त उपक्रम संपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता वेदांताच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीमधून ते हटवणार आहेत.
फॉक्सकॉन आयफोन आणि इतर ऍपल उत्पादने असेंबल करण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्याच्या व्यवसायात विविधता आणण्यासाठी चिप बनवण्यामध्ये त्याचा विस्तार झाला आहे.