Maharashtra Politics : मुंडेंच्या लेकीनंतर आता ‘या’ लोकनेत्याच्या सुनेवर वेळ ? पत्ता कट करण्याचा भाजपचा डाव? भाजपच्या राजकारणात भूकंप होणार

Ahmednagarlive24
Published:

Maharashtra Politics: आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने ४५ प्लस चे मिशन आखत पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधला आहे. परंतु मागील काही दिवसांमधील राजकारण पाहिले तर भाजपमध्ये जुन्या लोकांना डावलले जात असल्याचे बोलले जात आहे.

यात पंकजा मुंडे यांचे नाव नेहमीच चर्चेत येत असते. परंतु आता यात रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचे नाव देखील समोर यायला लागले आहे. स्व. गोपीनाथ मुंडे व आ.एकनाथ खडसे हे एके काळचे भाजपचे खंदे समर्थक.

त्यांना लोकनेते असे म्हटले जाते. या नेत्यांनी भाजप तळागाळात पोहोचवली. परंतु सध्या एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आहेत. परंतु त्यांची सून रक्षा खडसे ही भाजपच्या खासदार आहेत. परंतु रक्षा खडसे यांनी जे स्टेटमेंट दिल आहे त्याने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

केवळ खडसे नावामुळे मला डावललं जातंय
खडसे आडनावामुळे आणि सर्व परिस्थिती पाहता पक्षांतर केला जाण्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे. पण मी माझे मत याआधीही अनेकदा मांडले आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र असलो तरी त्यांची बाजू त्यांचा पक्ष वेगळा, आणि माझा पक्ष वेगळा.

त्यांची मते त्या पक्षाशी जुळतात आणि माझी मते या पक्षाशी जुळतात म्हणून मी येथे आहे. माझे वैयक्तिक काम किंवा मी गेल्या १० वर्षांत रावेर लोकसभा मतदारसंघात केलेले काम,जनतेशी असलेला जनसंपर्क हे सगळं पाहिलं पाहिजे.

पण ते न पाहता केवळ खडसे नावावरून तुम्ही मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचे आहे असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. तसेच मी महिला म्हणून २०१४ ची निवडणूक कोणत्या परिस्थितीत लढवली हे साऱ्या जगाला ठाऊक आहे.

ही लपून राहण्याची गोष्ट नाही. सगळ्यांना माहित आहे की मी काय अनुभवले. माझी ओळख फक्त खडसेंची सून म्हणून नव्हती. माझं वैयक्तिक कामही मी ग्राऊंड लेव्हलवर करण्याचा प्रयत्न केला आहे.

वैयक्तिक जनसंपर्क वाढला आहे. आणि त्यातूनच माझी ओळख वाढली आहे. त्यामुळे केवळ खडसे नावावरून तुम्ही मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचे आहे असे त्या म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe