मनोज जरांगेंमुळे सरकारचं टेन्शन वाढलं ! आंदोलनाबाबत काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे? पहा..

Tejas B Shelar
Published:

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकळ मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईकडे निघाला आहे. आज अंतरावली सराटी येथून ही पदयात्रा निघाली आहे. उद्या सायंकाळी अहमदनगरमध्ये या पदयात्रेचा मुक्काम असेल.

दरम्यान या आंदोलनाचा सरकरने धसका घेतला आहे, सरकार या आंदोलनांमुळे व मुंबईत जमा होणाऱ्या लाखो मराठा समाज बांधवांमुळे टेन्शनमध्ये आहे अशी चर्चा सध्या नागरिक करत आहेत. दरम्यान याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारणा करण्यात आली.

यावर बोलताना विखे पाटील यांनी सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे असे सांगितले. तसेच थोडासा वेळ आणखी काही गोष्टी करण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे आंदोलन थांबवावं असेही ते म्हणाले.

नेमके काय म्हणाले महसूल मंत्री विखे पाटील

२६ जानेवारीला जरांगेंचा मोर्चा मुंबई धडकणार असून याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. थोडासा वेळ आणखी काही गोष्टी करण्यासाठी लागणार आहे.

त्यामुळे आंदोलन थांबवावं असं मला वाटत. शरद पवार यांनी त्यांच्या सत्ता काळात कधी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले ते देखील त्यांनी जाहीर करावं असं त्यांनी म्हटले आहे. इतर समाजच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला हे आरक्षण द्यायचे आहे.

आमचे त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न सुरु आहेत. अद्याप पर्यंत अनेक गोष्टी केल्या असून महसूल मार्फत अनेक नोंदी शोधण्यात यश आले आहे. आता काही गोष्टी अजून करावयाच्या आहेत. परंतु तांत्रिक दृष्ट्या थोडा त्याला वेळ लागणार आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे असे महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe