प्रेरणादायी कहाणी: हिरे कारखान्यातील कामगाराचा मुलगा बनला भारताचा पहिला क्रिप्टो अब्जाधीश, कसं ते वाचा….

अनेक व्यक्ती आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या असह्य अशा अडचणींना तोंड देत जीवनामध्ये यशस्वी होतात. जेव्हा आपण त्यांचे यश पाहतो तेव्हा आपल्याला डोळ्यासमोर त्यांनी मिळवलेले यश दिसून येते. परंतु त्या मागील जर त्यांचा संपूर्ण जीवनपट पाहिला तर तो अनेक प्रकारच्या अडचणींनी संपूर्णपणे भरलेला असतो. यावर कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर मात करून असे व्यक्ती यशापर्यंत पोहोचलेले असतात.

तसे पाहायला गेले तर जीवनात यशस्वी होणे कोणालाच अशक्य नाही. आहे त्या परिस्थितीत समाधान न मानता जर ती परिस्थिती बदलण्यासाठी जर झटले  आणि प्रयत्नांना जर योग्य दिशा दिली व ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी  प्रयत्न केला तर नक्कीच माणूस जीवनात खूप मोठे यश मिळवते. या सिद्धांताला डोळ्यासमोर ठेवून जर आपण गुजरात मधील जयंती कनानी यांचा विचार केला तर आपल्याला त्यांचा कष्ट आणि जिद्द दिसून येते.

 जयंती कनानी यांचा यशाचा खडतर मार्ग

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, जयंती कनानी यांच्या जन्म हा गुजरात राज्यात एका गरीब कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील एका हिरे कारखान्यांमध्ये कामगार म्हणून काम करत होते. प्रतिकूल परिस्थिती असताना व असंख्य प्रकारच्या समस्यांना तोंड देत त्यांनी  त्यांचा शिक्षणाचा टप्पा पूर्ण केला व खूप कष्ट करून भारतातील पहिल्या क्रिप्टो अब्जाधीश सह संस्थापकांपैकी एक बनला. यामध्ये त्यांनी केलेले प्रचंड यश आणि जिद्द हे गुण फायद्याचे ठरले.

त्यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांचे  आर्थिक स्थिती इतकी हलाखीची होती की त्यांना त्यांच्या मुलांची शाळेची फी भरणे देखील कठीण होते. वडिलांवर कर्ज झालेले होते व हे कर्ज कमी करता यावे म्हणून जयंती हे  चांगली नोकरीच्या शोधात होते. त्यांच्या आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे शाळेचे फी भरणे कठीण असताना देखील त्यांनी जिद्दीच्या जोरावर इंजिनिअरिंग पूर्ण केले. परंतु कालांतराने वडिलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली.

त्यानंतर घराच्या उदरनिर्वाहासाठी जयंती यांनी पुण्यामध्ये सहा हजार रुपये प्रति महिना पगारावर नोकरी मिळवली. परंतु वडिलांचे काम गेल्यामुळे जयंतीला आता जास्त पैशांची आवश्यकता भासत होती त्याकरिता जास्तीत जास्त पगार मिळेल अशा नोकरीच्या शोधात ते होते. या प्रवासादरम्यान ते एका स्टार्टअप मध्ये कामासाठी रुजू झाले. दरम्यान त्यांनी अनेक अर्धवेळ प्रोजेक्टचे काम सुरू केले. अक्षरशः त्यांना लग्नासाठी देखील कर्ज काढावे लागेल.

या सगळ्या संघर्षाच्या प्रवासापर्यंत स्वतः एक अपडेट अब्ज डॉलरचे कंपनी उभारू शकू असा साधा पुसटसा विचार देखील जयंती यांच्या मनात नव्हता. पुण्यात नोकरी करत असताना आर्थिक भार कमी व्हावा याकरिता त्यांनी सतत काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये  डेटा विश्लेषक म्हणून कामाला लागले व या ठिकाणी त्यांनी संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन यांच्यासोबत स्टार्टअप सुरू करण्याचे निश्चित केले.

या तिघांनी मिळून 2017 मध्ये पॉलीगॉनची सहसंस्थापना केली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्बियन टेक्नोक्रेट मिहालिओ बिजेलीक हे त्यांचे चौथे सहसंस्थापक त्यांच्यामध्ये आले.त्यांच्या या स्टार्टअप कंपनीचे काम सुरू असताना  शार्क टॅंकचे न्यायाधीश आणि अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार असलेले मार्क क्यूबन त्याच्याकडून त्यांनी त्यांच्या स्टार्टअप करिता गुंतवणूक मिळवली.

इतकेच नाहीतर 2022 मध्ये पॉलीगॉनने सॉफ्ट बँक तसेच टायगर ग्लोबल, सेकोवा कॅपिटल इंडिया यांच्यासारख्या प्रसिद्ध गुंतवणूकदारांकडून जवळजवळ 450 दशलक्ष डॉलरचा निधी देखील उभारला. आज जर आपण त्यांच्या या स्टार्टअप कंपनीचे मूल्यांकन पाहिले तर ते हजारो कोटी डॉलरच्या घरात आहे.

अशाप्रकारे त्यांनी खूप मोठ्या जिद्दी आणि मेहनतीने यश संपादन करून भारताचा पहिला क्रिप्टो अब्जाधीश होण्याचा मान मिळवला. जयंती यांच्या उदाहरणावरून दिसून येते की प्रचंड प्रमाणात कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असली तर माणूस कुठलीही गोष्ट शक्य करून दाखवू शकतो..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe