पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यभरात गणेशोत्सवाच्या सुरवातीपासून पाऊस आला होता, विसर्जनाच्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
महाराष्ट्राच्या सर्वच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू असून, अजून किमान ३० सप्टेंबरपर्यंत जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिली होती.

त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली होती. मात्र कमी दाबाचे पट्टे, तसेच इतर पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार आहे.
विशेषतः घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. कोकण, विदर्भातदेखील पाऊस जोरदार राहणार आहे. तर मराठवाड्यातील काही भागातही मुसळधार ‘पाऊस बरसणार आहे.
या भागात यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक,अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, जालना, परभणी, बीड, लातूर, अकोला, अमरावती,













