सावधान…! चहा पिताना ही घ्या काळजी

Published on -

२७ फेब्रुवारी २०२५ पुणे : आपल्या देशामध्ये अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. अनेक जण सकाळी काहीही न खाता रिकाम्या पोटी चहा घेतात. परंतु, रिकाम्या पोटी चहा घेणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आहार तज्ज्ञांच्या मते उपाशी पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी, हाडांचे नुकसान आणि अगदी प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो.

चहाचा पीएच सहा असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे, असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस अॅसिडिटीची समस्या वाढते.

जर, नियमितपणे चहा पिणाऱ्याच्या पोटात अॅसिडचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते.सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने दात खराब होतात.यामुळे दातांचा बाहेरचा थर खराब होऊन त्यात किडण्याचा धोका वाढतो.

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता आणि शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते.यामुळे चक्कर येऊ शकते. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे चहाच्या आधी पाणी प्यावे. तसेच चहाबरोबर काहीतरी खाण्याची सवय असल्यास त्रास कमी होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe