Conjunctivitis : काळजी घ्या! डोळ्यांच्या साथीत वाढ ! परिवाराची काळजी असेल तर हे उपाय कराच…

Published on -

Conjunctivitis : यंदाच्या पावसाळ्यात कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, या अतिशय संक्रमणशील अशा डोळ्यांच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत आहेत. कन्जक्टिव्हायटिसला सामान्यपणे ‘पिंक आय’ (डोळे येणे) म्हणून ओळखले जाते.

यामध्ये डोळ्यातील पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत पृष्ठभागाला आच्छादणाऱ्या कंजंक्टिव्हा या पातळ पडद्यावर दाह निर्माण होतो. हा प्रादुर्भाव समुदायातील अन्य व्यक्तींमध्ये वेगाने पसरू शकतो. त्यामुळे जागरूकता व प्रतिकाराचे उपाय त्वरित करण्याची गरज भासत आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत कन्जंक्टिव्हायटिसच्या प्रमाणात चिंताजनक म्हणजेच १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दररोजच्या बाह्यरुग्णांपैकी सुमारे १५ टक्के कन्जंक्टिव्हायटिसची लक्षणे असलेले आहेत आणि हा प्रादुर्भाव अधिक संसर्गजन्य व संक्रमणशील वाटत आहे.

याबाबत नेत्रविकार तज्ज्ञ आणि कॅटरॅक्ट सर्जन डॉ. टी. एस. सुजाता यांनी सांगितले की, पावसाळ्यामधील आर्द्रतेच्या प्रचलनामुळे विषाणूंच्या वाढीला बढावा मिळतो आणि कन्जंक्टिव्हायटिसच्या प्रसारासाठी पोषक वातावरण निर्माण होते.

पाणी साचणारे भाग तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे पालन नीट केले जात नाही अशा प्रदेशांमध्ये उदाहरणार्थ, झोपडपट्ट्या, संक्रमणाचा धोका अधिक असतो. लहान मुले, त्यांचे कुटुंबीय आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कन्जक्टिव्हायटिसची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे.

हा आजार झालेल्यांमध्ये ३० ते ४० टक्के प्रमाण यांचेच आहे. अद्याप शाळा किंवा कामाच्या ठिकाणी कन्जंक्टिव्हायटिसच्या विषाणूचे पुंजके आढळले नसले तरी सध्याच्या हवामानामुळे असे पुंजके अस्तित्वात असण्याची दाट शक्यता आहे.

घरगुती उपचारांवर हवाला ठेवणाऱ्या, वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय स्वतःच्या मनाने (ओव्हर द काऊंटर) औषधे घेणाऱ्या व्यक्तींना विषाणूजन्य कन्जक्टिव्हायटिसमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

कन्जक्टिव्हायटिसचा प्रसार टाळण्यासाठी सुलभ प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब अत्यावश्यक आहे. चेहरा नियमितपणे धुणे, डोळ्याला वारंवार हात न लावणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहेत.

पालकांनी मुलांना नियमितपणे हात धुण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे तसेच हातरुमाल किंवा वैयक्तिक वापराच्या वस्तू अन्य मुलांसोबत वाटून घेणे टाळण्याचा सल्ला दिला पाहिजे, असेही डॉ. सुजाता यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe