Health News : कोरोनाचे संकट कमी झाले, स्वाइन फ्लू आटोक्यात पण आता आली डोळे येण्याची साथ ! अशी घ्या काळजी

Published on -

Health News : विषाणू संसर्ग काळात डोळ्यांचे अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात डोळे येण्याची साथ उद्भवत असल्याने औषधोपचार करून डोळ्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचे संकट कमी झाले, स्वाइन फ्लूचा विळखा आटोक्यात आला पावसाळी आजारांचा संसर्ग जेमतेम आहे. आता डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक भागातील नागरिकांना डोळ्यांशी संबंधित तक्रारी जाणवू लागल्या आहेत.

डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढ लागली आहे. डोळे येण्याच्या संसर्गामुळे नागरिक धास्तावले असून, लक्षणे दिसताच उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागासह सामाजिक आणि सेवाभावी संस्थेकडून करण्यात येत आहे.

अशी आहेत लक्षणे : संपूर्ण डोळे लाल होणे, डोळ्यांच्या कडा लाल होणे, पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांत सतत काहीतरी गेल्यासारखे वाटणे. सतत पाणी येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळे जड वाटणे, उजेड सहन न होणे, डोळे येण्यासोबतच संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला या तक्रारीही जाणवतात.

अशी घ्या काळजी….

डोळे आल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये.

डोळे सतत स्वच्छ पाण्याने धुवा. प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे.

कुटुंबीयांपासून दूर राहावे. तेलकट खाणे टाळा.

डोळ्यांची जळजळ व त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरी सल्ला घ्यावा.

डोळे आल्यास अस्वच्छ हाताने चोळू नयेत.

डोळ्यांना स्पर्श केल्यास लगेच हात धुवावेत

डोळे आलेल्या व्यक्तींचे टॉवेल इतरांनी वापरू नयेत.

डोळे आलेल्या रुग्णांत वाढ होत आहे. डोळे लाल होणे, सुजणे, डोळ्यातून पाणी येणे, खाज होणे, जळजळणे, पापण्या चिकटणे ही डोळे येण्याची लक्षणे आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हातांची स्वच्छता ठेवावी, वारंवार डोळ्याला हात लावू नये, चष्म्याची स्वच्छता ठेवावी, कपडे किंवा चष्मा इतरांना वापरण्यास देऊ नये, गर्दीची ठिकाणे व पोहणे टाळावे. अशा सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe