Diabetes Diet : सध्याची बदलती जीवनशैली आणि आरोग्याचा अभाव यामुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यापैकी एक आजार म्हणजे मधुमेह होय. यावर कोणताही खात्रीशीर उपचार नाही परंतु तुम्ही तो नियंत्रणात ठेवू शकतो.
त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे? काय खाऊ नये असे अनेक प्रश्न पडतात. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडत असतील तर काळजी करू नका. तुम्ही आता काही पदार्थांमुळे यावर नियंत्रण मिळवू शकता. कसे ते जाणून घ्या.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्येही साखरेची तीव्र इच्छा जास्त असते. कारण शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने गोड खाण्याची इच्छा होते. नियंत्रण ठेवले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये साखरेची इच्छा कमी करण्यासाठी अनेक गोष्टींचे सेवन करू शकता.
बेरी- स्ट्रॉबेरी, रास्पबेरी तसेच ब्लूबेरी यांसारख्या बेरीमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट असून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित आणि साखरेची इच्छा कमी करण्यास मदत करतात.
एवोकॅडो- एवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर असून हे रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. यामुळे साखरेची इच्छाही कमी होते.
नट्स- बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांसारख्या नट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात, यामुळे साखरेची लालसा कमी होऊन जास्त काळ पोट भरलेले राहते.
ग्रीक दही- ग्रीक दह्यांमध्ये कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम सारख्या प्रथिने आणि खनिजे असतात, जे साखरेची लालसा कमी करून पोट भरून ठेवण्यास मदत होते.
दालचिनी- दालचिनीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. तसेच जर तुम्ही दालचिनी पावडर सकाळी पाण्यात मिसळून सेवन केल्यास मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायद्याचे मानले जाते.
डार्क चॉकलेट- यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात ज्यामुळे साखरेची लालसा कमी होऊन तुमची गोड पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण होते.
पालक- लोह, मॅग्नेशियम सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असल्याने साखरेची इच्छा कमी होते. तसेच यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते.
रताळे- रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि जीवनसत्त्वे आढळून येतात. त्यामुळे साखरेची लालसा कमी होऊन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.