EFPO : कर्मचाऱ्यांची दिवाळी, लवकरच खात्यात जमा होणार PF, वाचा सविस्तर..

EFPO : दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (पीएफ खाते) व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही एक पर्वनीच ठरणार आहे.

दरम्यान, EPFO ​​ने गुंतवणुकीसाठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला होता. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून ती लवकरच पूर्ण होईल. दरम्यान, जेव्हा व्याज जमा केले जाईल तेव्हा ते पूर्ण भरले जाईल. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना संयम बाळगा असे सांगितले आहे. दरम्यान, ईपीएफओनुसार व्याजात कोणतीही कपात केली जाणार नाही.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीच २४ कोटींहून अधिक खात्यांमध्ये व्याज जमा करण्यात आले आहे. तर एकदा व्याज जमा झाले की, ते व्यक्तीच्या पीएफ खात्यात दिसून येईल. दरम्यान, कोणतीही व्यक्ती भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक टेक्स्ट मेसेज, मिस्ड कॉल, उमंग अॅप आणि EPFO ​​वेबसाइटद्वारे तपासू शकते.

व्याज कसे ठरते

पीएफचा व्याजदर दरवर्षी अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत करून EPFO ​​च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) द्वारे ठरवले जाते. यावर्षी EPFO ​​ने जुलैमध्ये व्याजदर जाहीर केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe