चला चहा घेऊ !! असं म्हणणारी मंडळींची संख्या खूप मोठी आहे. याचे कारण म्हणजे अप्लयके चहा शौकीन असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आजमितीला आपल्या आजूबाजूला पहा तुमच्या लक्षात येईल की ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक चहाप्रेमी आहेत.
चहाप्रेमी कोणत्याही ऋतूत कितीही चहा पितील. पण हिवाळ्यात चहा पिण्याची मजा काही औरच. अनेकदा हा चहा आरोग्यास हानिकारक असल्याचे बोलले जाते. परंतु आम्ही येथे तुम्हाला पाच प्रकारचे चहा सांगणार आहोत की जे तुमच्या फुफ्फुसाचे वाढत्या प्रदूषणापासून रक्षण करतील.
प्रदूषणाची मोठी समस्या
सध्या हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. दिल्लीत तर परिस्थती हाताबाहेर गेली आहे. हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर तुम्ही निरोगी राहू शकता.
या ठिकाणी आपण लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही पाच प्रकारच्या चहाबद्दल माहिती पाहणार आहोत जे तुमच्या फुफ्फुसाचे वाढत्या प्रदूषणापासून रक्षण करतील सोबतच या ऋतूत तुम्हाला उबदार ठेवण्यासही मदत करतील. चहामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून आपले संरक्षण करतात.
कॅमोमाइल चहा ट्राय करा
कॅमोमाइल चहा बद्दल तुम्ही ऐकले असेलच. वाढत्या प्रदूषणात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी हा एक जबरदस्त पर्याय आहे. कॅमोमाइल चहात एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने तुमच्या घशातील सूज आणि वेदना कमी होते. त्यात असणारे अँटिऑक्सिडंट्स हे तुमच्या घशाती, शरीरातील उती, पेशी रिपेअर करतात. अँटिस्पास्मोडिक प्रक्रियेमुळे खोकला कमी होण्यास मदत होते.
दुसरा पर्याय लेमन हनी ग्रीन टी
मध टाकून ग्रीन टी पिणे हे अनेक लोकांच्या डाएटचा एक भाग झाला आहे. सामान्यतः लोक वजन कमी करण्यासाठी ते पितात. हे तुमच्या फुफ्फुसांसाठी देखील फायदेशीर आहे. विशेषत: लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि आपली फुफ्फुसे पूर्णपणे स्वच्छ होण्यास मदत होते.
तुमची पसंत अद्रक चहा
सर्वांची एक पसंत आहे ते म्हणजे आले टाकून बनवलेला चहा. हा चविष्ट तर लागतोच शिवाय हा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा एक घटक असतो ज्याचा शरीरावर एंटी-इंफ्लेमेटरी म्हणून प्रभाव पडतो. यामुळे प्रदूषणामुळे होणारी वायुमार्गाची जळजळ कमी होते.
मसाला चहा उर्फ काढा हा उत्तम पर्याय
मसाला चहा पिण्याचे अनेक शौकीन आहेत. औषधी वनस्पती आणि मसाल्यांच्या मिश्रणातून हा चहा तयार केला जातो. यात आले, दालचिनी, लवंगा, जायफळ आदी टाकलेलं असते. हे अँटी-व्हायरल, अँटी-सेप्टिक असते. यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढते.