Health News : तस जर पाहिलं तर हिवाळ्यात अनेकांना सर्दी खोकला आदी होताना दिसताच. परंतु यंदाचे वातावरण पूर्णतः विषम झाले आहे. पाऊस, धुके, थंडी आदी वातावरणाने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
अनेकांच्या तोंडून सध्या सर्दी खोकला आदी आजार खूप पहिले पण यंदाची सर्दी काही लवकर जात नाही असे वक्तव्य अनेकदा बाहेर पडताना दिसत आहे. वेळीच जर काळजी घेतली नाही तर कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला अधिक तापदायक ठरू शकतो असे तज्ज्ञ म्हणतात.
या लक्षणांकडे ठेवा लक्ष
अनेकदा आपल्याला शिंका येतात. परंतु धुळीमुळे हे होत असेल असे म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु जर आता थंडीच्या दिवसात तर वरच्या वर आपल्याला सर्दी, खोकला जाणवू शकतो. पण जर खूप दिवस होऊनही तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर,
मात्र सावध व्हा. एक-दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ टिकणारी सर्दी ही साइनोसाइटसचे लक्षण असू शकते. सर्दीसह तुम्हाला ताप, खोकला व सतत थकवा जाणवत असेल तर, वेळीच लक्षणे तपासून घ्या. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप,
श्वास घेण्यास त्रास, मळमळ, डोकेदुखी ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून तुमची चाचणी करून घेणे गरजेचे असल्याचे तज्ञ म्हणतात.
सर्दी, खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ करा
– जर तुमचा सर्दी आणि खोकला औषध घेऊनही बरा होत नसेल तर तुम्ही नियमितपणे आले आणि गूळ मिसळून सेवन करू शकता. हे कप काढून टाकण्यास मदत करेल. गूळ गरम करून वितळवून त्यात आल्याची पेस्ट मिक्स करून कोमट झाल्यावर खावी.
– मध आणि आले यांचे मिश्रण सर्दी, खोकला आणि घसादुखीवर प्रभावी ठरते. यासाठी एक आले बारीक करून त्यात मध मिसळा. दिवसातून ३ ते ४ वेळा याचे सेवन केल्यास खोकल्यापासून आराम मिळेल.
– सकस आहार, नियमित व्यायाम, व्यसनापासून दूर राहा. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या