दारूतून लाखोंची कमाई ! मद्य पिण्याऐवजी ते बनवऱ्या ‘या’ पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले पैसे तर सहा महिन्यात लखोपती व्हाल

आजकाल देशात मद्य व्यवसाय चांगलाच तेजीत सुरु आहे. लाखो रुपयांचा महसूल या कंपन्या गोळा करतात. मद्य पिणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. पण आम्ही तुम्हाला मद्य प्या असा सल्ला देणार नाहीत. उलट जर तुम्ही मद्य पिण्याऐवजी त्या मद्य बनवणाऱ्या कंपनीचा शेअर्स जर घेतला तर लाखो रुपये कमवाल. भारतात निवडक मद्य कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत.

यातील टॉप 5 मद्य कंपन्यांचा केवळ 6 महिन्यांचा परतावा पाहिला तर तो जवळपास दुप्पट आहे. म्हणजेच मद्य पिण्यास पैसे घालवण्याऐवजी शेअरमध्ये जर कुणी 1 लाख रुपये गुंतवले असते तर सहा पाहण्यात त्याचे दोन लाख रुपये झाले असते. 2021 मध्ये, जागतिक अल्कोहोलिक पेय बाजाराचा आकार 1624 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला होता आणि हाच आता 2031 पर्यंत 2036.6 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चला आपण याठिकाणी मद्य कंपन्यांचे टॉप 5 शेअर्स पाहून घेऊ ज्यांनी सहा महिन्यात पैसे डबल केले आहेत.

United Spirits: United Spirits ही या मार्केटमधील एक मोठी नामंकित कंपनी आहे. याचे मार्केट कॅप जवळपास 75,869 करोड रुपये आहे. आज या कंपनीच्या शेअरची किंमत 1043 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीचा एक वर्षाचा उच्चांक 1110 रुपये आणि नीचांकी स्तर 730.55 रुपये राहिला आहे. या शेअर्सने 6 महिन्यांत दिलेले रिटर्न पाहिले तर ते जवळपास 32 टक्के आहे.

Jagatjit Industries : या कंपनीचा शेअर जर तुम्ही पाहिलात तर आज याची किंमत 225 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीचा एक वर्षाचा उच्चांक 247.10 रुपये आणि नीचांकी स्तर 72.25 रुपये राहिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 1,043 कोटी रुपये आहे. जगतजीत इंडस्ट्रीजच्या शेअर्सने 6 महिन्यांत 125 टक्के रिटर्न दिला आहे.

Tilaknagar Industries: आज या कंपनीच्या शेअरची किंमत 253 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीचा एक वर्षाचा उच्चांक 262.80 रुपये आणि नीचांकी स्तर 92.60 रुपये राहिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 4,861 कोटी रुपये आहे. Tilaknagar Industriesच्या शेअर्सने 6 महिन्यांत 88 टक्के रिटर्न दिला आहे.

Associated Alchol Breweries कंपनी देखील या टॉप 5 रिटर्न देणाऱ्या कंपन्यांच्या लिस्टमध्ये येते. या कंपनीचं मार्केटकॅप जवळपास 842 कोटी आहे. आज या कंपनीच्या शेअरची किंमत 466 रुपयांच्या आसपास आहे. या शेअर्सने 6 महिन्यांत 32 टक्के रिटर्न दिला आहे.

Som Distilleries Breweries & Wineres: आज या कंपनीच्या शेअरची किंमत 296 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीचा एक वर्षाचा उच्चांक 390.00 रुपये आणि नीचांकी स्तर 109.55 रुपये राहिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 2,285 कोटी रुपये आहे. Som Distilleries Breweries & Wineres च्या शेअर्सने 6 महिन्यांत 62 टक्के रिटर्न दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe